​मिनाक्षी शेक्षाद्रीमुळे या प्रसिद्ध बॉलिवूडच्या गायकाचा झाला होता घटस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2017 16:08 IST2017-10-23T10:38:51+5:302017-10-23T16:08:51+5:30

मिनाक्षी शेक्षाद्रीने हिरो, बेवफाई, दिलवाला, दामिनी यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तिला जुर्म आणि दामिनी या चित्रपटांसाठी ...

Due to Minakshi Shekkadri, the famous Bollywood singer was divorced | ​मिनाक्षी शेक्षाद्रीमुळे या प्रसिद्ध बॉलिवूडच्या गायकाचा झाला होता घटस्फोट

​मिनाक्षी शेक्षाद्रीमुळे या प्रसिद्ध बॉलिवूडच्या गायकाचा झाला होता घटस्फोट

नाक्षी शेक्षाद्रीने हिरो, बेवफाई, दिलवाला, दामिनी यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तिला जुर्म आणि दामिनी या चित्रपटांसाठी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. मिनाक्षीने १९९८ मध्ये स्वामी विवेकानंद या चित्रपटात काम केले होते. त्यानंतर हरिश मैसूर या इन्व्हेस्टमेंट बँकरसोबत लग्न केल्यानंतर मिनाक्षी न्यू यॉर्कमध्ये सेटल झाली आणि त्यानंतर ती चित्रपटांमध्ये झळकलीच नाही. गेल्याच वर्षी घायल वन्स अगेन या चित्रपटात तिला अनेक वर्षांनी पाहायला मिळाले. मिनाक्षी चित्रपटसृष्टीत असताना तिच्या व्यवसायिक आयुष्याइतकेच तिचे वैयक्तिक आयुष्य देखील नेहमीच चर्चेत असायचे. तुम्हाला माहीत आहे का एका प्रसिद्ध गायकासोबतचे तिचे प्रेमप्रकरण चांगलेच गाजले होते. या गायकाच्या पत्नीने आमच्या घटस्फोटासाठी मिनाक्षीच कारणीभूत असल्याचे म्हटले होते. 

kumar sanu wife

जब कोई बात बिगड जाये हे मिनाक्षी शेक्षाद्रीवर चित्रीत करण्यात आलेले गाणे प्रचंड गाजले होते. हे गाणे कुमार सानूने गायले असल्याचे आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. याच कुमार सानू आणि मिनाक्षीचे अनेक वर्षं अफेअर होते. कुमार सानूची पहिली पत्नी रिटाने त्यांच्या घटस्फोटासाठी मिनाक्षीला जबाबदार धरले होते. १९९४ला प्रकाशित झालेल्या फिल्मफेअर मासिकानुसार कुमारची पत्नी रिटाने घटस्फोटाची केस दाखल करताना मिनाक्षी त्यांच्या घटस्फोटासाठी कारणीभूत असल्याचे घटस्फोटाच्या कारणामध्ये लिहिले होते. फिल्मफेअरमध्ये ही बातमी आल्यानंतर या बातमीची चांगलीच चर्चा झाली होती. पण मिनाक्षीने यावर मौन राखणेच पसंत केले होते. मिनाक्षीवर रिटाने खोटा आरोप केला असल्यास तिने कोणतीही कायदेशीर कारवाई का केली नाही असे त्यावेळी मीडियाचे म्हणणे होते. त्यावरूनच मिनाक्षीच्या आणि कुमार सानूच्या प्रेमप्रकरणाविषयी सगळ्यांना कळले होते. 
घटस्फोटाबद्दल रिटाने मीडियाशी बोलताना सांगितले होते की, मी गरोदर असताना कुमार सगळे पैसे मिनाक्षीवर उघळत होता. त्यावेळी माझ्याकडे एक रुपयादेखील नसायचा. मिनाक्षी आणि कुमार यांच्याविषयी सुरुवातीला मला कळल्यावर मिनाक्षीसारखी सुसंस्कृत मुलगी असे करू शकेल यावर माझा विश्वासच बनला नव्हता. पण नंतर मला सगळ्या गोष्टी हळूहळू करून कळायला लागल्या. 

Also Read : या गायकाने एका दिवसात २८ गाणी रेकॉर्ड केली आहेत

Web Title: Due to Minakshi Shekkadri, the famous Bollywood singer was divorced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.