फ्लॉप चित्रपटांमुळे वाढला दुरावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2016 08:20 IST2016-01-16T01:08:07+5:302016-02-11T08:20:34+5:30

दिलवालेचा बॉक्स ऑफिसवरचा परिणाम आल्यानंतर ही चर्चा सुरू झाली आहे की आता शाहरुख खान आणि रोहित शेट्टीची टीम पुन्हा ...

Due to the increase in flop cinemas | फ्लॉप चित्रपटांमुळे वाढला दुरावा

फ्लॉप चित्रपटांमुळे वाढला दुरावा

लवालेचा बॉक्स ऑफिसवरचा परिणाम आल्यानंतर ही चर्चा सुरू झाली आहे की आता शाहरुख खान आणि रोहित शेट्टीची टीम पुन्हा सोबत काम करेल की नाही? याला कारणही तसेच आहे. फ्लॉप चित्रपट बनविणार्‍या दिग्दर्शकांसोबत शाहरुखने पुन्हा काम करण्याची हिंमत कधीच दाखविली नाही.
शाहरुख खानच्या करिअरवर नजर टाकली तर, राकेश रोशनचा 'किंग अंकल' त्याचा सुरुवातीचा चित्रपट होता. 'किंग अंकल' चालला नाही तरी, शाहरुखानने राकेश रोशनचा पुढचा चित्रपट 'करण अर्जुन' मध्ये काम केले, जो सुपर हिट झाला.

करण अर्जुन नंतर राकेश रोशनचा पुढचा चित्रपट 'कोयला' होता.
ज्याची घोषणा सनी देओलला घेऊन झाली होती. शाहरुखने या चित्रपटासाठी हट्ट केला आणि राकेश रोशन यांनी 'कोयला' मध्ये सनीला हटवून त्याला हिरो बनविले. परंतु 'कोयला' सुपर फ्लॉप झाला आणि शाहरुखला पुढच्या चित्रपटाची कथा सांगण्यासाठी राकेश रोशन दोन वर्षे इकडे तिकडे भटकले, मात्र शाहरुखने त्यांची कथा ऐकली नाही.

शोले फेम र्निदेशक रमेश सिप्पीने शाहरुख सोबत 'जमाना दीवाना' बनविला तेव्हा शाहरुख त्यांचे कौतुक करताना थकत नव्हता. मात्र चित्रपट चालला नाही आणि रमेश सिप्पीचा पुढच्या चित्रपटात काम करायला शाहरुखला वेळच मिळाला नाही. याचप्रकारे 'अंजाम' फ्लॉप झाल्यावर राहुल रवैलपासून शाहरुख लांब होत गेला. साऊथचे दिग्गज दिग्दर्शक मणिरत्नमने त्यांच्या सोबत 'दिल से' बनविला होता. पण, बॉक्स ऑफिसवर तो घाट्याचा सौदा ठरला. यानंतर शाहरुखने पुन्हा कधी त्यांच्या चित्रपटात काम केले नाही. देवदासचा किस्सा जगजाहीर आहे. 'देवदास'मध्ये पहिल्यांदाच शाहरुखने संजय लीला भंसाळींसोबत काम केले होते. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर मोठे यश नाही मिळाले. तरीही भंसाळीसोबत शाहरुखची जवळीकता वाढली. परंतु 'सांवरिया' आणि आता 'बाजीराव मस्तानी' नंतर ते पुन्हा दुरावले आहेत.

Web Title: Due to the increase in flop cinemas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.