Drishyam 2 Box Office Collection Day 7: ‘दृश्यम 2’ने बॉक्स ऑफिसवर ठोकलं शतक, पहिल्याच आठवड्यात रेकॉर्डब्रेक कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 11:17 AM2022-11-25T11:17:26+5:302022-11-25T11:18:20+5:30

Drishyam 2 Box Office Collection Day 7: बॉलिवूडचा ‘सिंघम’ अजय देवगणचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा धूम करतोय. ‘दृश्यम 2’ छप्परफाड कमाई करतोय...

'Drishyam 2' scored a century at the box office, a record-breaking collection in its first week | Drishyam 2 Box Office Collection Day 7: ‘दृश्यम 2’ने बॉक्स ऑफिसवर ठोकलं शतक, पहिल्याच आठवड्यात रेकॉर्डब्रेक कमाई

Drishyam 2 Box Office Collection Day 7: ‘दृश्यम 2’ने बॉक्स ऑफिसवर ठोकलं शतक, पहिल्याच आठवड्यात रेकॉर्डब्रेक कमाई

googlenewsNext

Drishyam 2 Box Office Collection Day 7:  बॉलिवूड ‘सिंघम’अजय देवगणचा (Ajay Devgn) सिनेमा बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा धूम करतोय. होय, अजयचा ‘दृश्यम 2’  गेल्या 18 नोव्हेंबरला प्रदर्शित झाला आणि सातच दिवसांत या सिनेमाने 100 कोटींचा आकडा पार केला आहे. ‘दृश्यम 2’बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई करतोय.

‘दृश्यम 2’ हा चित्रपट १८ नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. ट्रेलरपासूनच या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता वाढली होती. पहिल्याच आठवड्यात अजय देवगणच्या सिनेमाने 100 कोटींपर्यंत मजल मारल्याने बॉलिवूडकरांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत. गेल्या काही महिन्यांत बॉलिवूडचे अनेक मोठे सिनेम दणकून आपटले. अशात ‘दृश्यम 2’ने पहिल्याच आठवड्यात 100 कोटींचा गल्ला जमवलेला पाहून बॉलिवूडकर खुश्श आहेत.

इतकी केली कमाई
‘दृश्यम 2’ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 15.38 कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी शनिवारी 21.59 कोटी, तिसऱ्या दिवशी रविवारी 27.17 कोटींचा बिझनेस केला होता. सोमवारी कमाईत थोडी घट झाली. पहिल्या सोमवारी या सिनेमाने 11.87 कोटी कमावले. मंगळवारी 10.48 कोटी, बुधवारी 9.55 कोटी आणि, गुरूवारी 8.62 कोटींचा बिझनेस केला. याचबरोबर सिनेमाची एकूण कमाई 104.66 कोटींवर पोहोचली. ‘दृश्यम 2’ या वर्षीचा शतक ठोकणारा पाचवा सिनेमा ठरला आहे. तर अजय देवगणच्या करिअरचा 100 कोटी कमाई करणारा 13 वा सिनेमा ठरला आहे.
 
‘भुल भुलय्या’ला मागे टाकलं
अजय देवगणच्या ‘दृश्यम 2’ने कमाईच्या बाबतीत यावर्षीचा सुपरहिट सिनेमा ‘भुल भुलय्या’ला मागे टाकलं आहे. कार्तिक आर्यनच्या भुल भुलय्याने पहिल्या आठवड्यात 92.05 कोटींची कमाई केली होती. ‘दृश्यम 2’ने पहिल्या आठवड्यात 100 कोटींचा पल्ला गाठला.


 
पुढची वाट कठीण...

‘दृश्यम 2’ने 100 कोटींचा आकडा सहज पार केला. पण पुढची वाट सोपी नाही. आज 25 नोव्हेंबरला वरूण धवण व क्रिती सॅननचा ‘भेडिया’ रिलीज झाला आहे. या दोन्ही सिनेमात जबरदस्त फाईट रंगणार आहे. आता यापैकी कोण बाजी मारतो, ते बघूच.

‘दृश्यम 2’ एका मल्याळम सिनेमाचा हा रिमेक आहे. मर्डर मिस्ट्री असलेल्या या चित्रपटाच्या पहिल्या भागालाही प्रेक्षकांकडून पसंती मिळाली होती. अजय देवगणसह ‘दृश्यम 2’मध्ये तब्बू, अक्षय खन्ना, श्रीया सरन, इशिता दत्ता या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. 

Web Title: 'Drishyam 2' scored a century at the box office, a record-breaking collection in its first week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.