​ रणबीर कपूरसोबत ज्या ड्रेसमध्ये फिरली होती; तोच घालून पती विराटसोबत दिसली अनुष्का शर्मा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2018 12:10 IST2018-01-03T06:35:47+5:302018-01-03T12:10:17+5:30

 रणबीर कपूरसोबत ज्या ड्रेसमध्ये फिरली होती तोच घालून पती विराटसोबत दिसली अनुष्का शर्मा! बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने गत ११ ...

The dress that Ranbir Kapoor had wandered; Anushka Sharma found her husband with Virat | ​ रणबीर कपूरसोबत ज्या ड्रेसमध्ये फिरली होती; तोच घालून पती विराटसोबत दिसली अनुष्का शर्मा!

​ रणबीर कपूरसोबत ज्या ड्रेसमध्ये फिरली होती; तोच घालून पती विराटसोबत दिसली अनुष्का शर्मा!

 
णबीर कपूरसोबत ज्या ड्रेसमध्ये फिरली होती तोच घालून पती विराटसोबत दिसली अनुष्का शर्मा!

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने गत ११ डिसेंबरला भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहलीसोबत गुपचूप लग्न करून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. इटलीत लग्न आणि यानंतर दिल्ली व मुंबई अशा दोन ठिकाणी ग्रॅण्ड रिसेप्शन दिल्यानंतर हे नवविवाहित जोडपे सध्या साऊथ आफ्रिकेत केपटाऊन येथे आहे.   इथे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांत कसोटी सामने, एकदिवसीय सामने आणि टी२० सामने होणार आहेत. 
मुंबईमधील रिसेप्शननंतर लगेच विरूष्का दक्षिण आफ्रिकेसाठी रवाना झालेत. याचठिकाणी त्यांना नववर्षाचे स्वागत केले. सध्या याठिकाणचे दोघांचे फोटो वेगाने व्हायरल होत आहेत. यातील एका फोटोची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. खरे तर अनुष्का शर्मा तिच्या स्टाईल स्टेटमेंटसाठी ओळखली जाते. पण विराटसोबत तिला अशा आऊटफिटमध्ये बघितले गेले की ते पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. होय, अनुष्काने याठिकाणी दोन वर्षापूर्वीचा एक आऊटफिट रिपीट केलेला दिसला.



ALSO READ : अनुष्का शर्मा अन् विराट कोहलीने केले ५०% सेलमध्ये शॉपिंग; लोकांनी उडवली खिल्ली!

सामान्य माणूस एकच कपडा अनेकदा घालत असेल तर त्याने काहीही फरक पडत नाही. पण बी-टाऊनचे सेलिब्रिटी असे करत असतील तर त्याची लगेच बातमी होते. अनुष्काही सध्या याचमुळे चर्चेत आहेत. रणबीर कपूरच्या फॅनक्लबने अनुष्काचे दोन फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत ती पती विराटसोबत आहे तर दुसºया फोटोत रणबीरसोबत. पहिला फोटो सध्याचा केपटाऊनमधला आहे तर दुसरा फोटो ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानचा जुना फोटो आहे. या दोन्ही फोटोत अनुष्काने सेम टू सेम श्रग आणि ब्लॅक टॉप घातलेले दिसतेय. म्हणजेच सुमारे दोन वर्षांपूर्वी ‘ऐ दिल है मुश्किल’च्या प्रमोशनवेळी घातलेला ड्रेस अनुष्काने केपटाऊनमध्ये कॅरी केला आहे.
अलीकडे विराट व अनुष्का दोघेही केपटाऊनमध्ये ५० % सेलमध्ये शॉपिंग करताना दिसले होते. त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. शिवाय या फोटोवरून नेटिजन्सलनी विराट व अनुष्काची  मजाही घेतली होती. लग्नात इतका खर्च केला की आता विरूष्काला सेलमध्ये शॉपिंग करावी लागतेय, इथपर्यंत लोक बोलून गेले होते.

Web Title: The dress that Ranbir Kapoor had wandered; Anushka Sharma found her husband with Virat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.