‘डॉन 3’मध्ये जॅकलीन नाही तर असणार कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2016 21:19 IST2016-06-25T15:49:57+5:302016-06-25T21:19:57+5:30
‘डॉन 3’ची सध्या जोरात चर्चा सुरु आहे. चर्चा आहे ती ‘डॉन 3’मध्ये प्रियंका चोपडा असेल की नसेल याची..शाहरूख खानला ...
.jpg)
‘डॉन 3’मध्ये जॅकलीन नाही तर असणार कोण?
‘ ॉन 3’ची सध्या जोरात चर्चा सुरु आहे. चर्चा आहे ती ‘डॉन 3’मध्ये प्रियंका चोपडा असेल की नसेल याची..शाहरूख खानला म्हणे या चित्रपटात प्रियंका नकोय. (प्रियंका व शाहरूखच्या अफेअरच्या बातम्या चांगल्याच गाजल्या होत्या आणि यामुळे शाहरूखची स्वीट अॅण्ड स्मार्ट पत्नी गौरी नाराज झाली होती. तिची नाराजी दूर करता करता शाहरूखच्या चांगलेच नाकीनऊ आले होते.) यानंतर बातमी आली ती ‘डॉन 3’मध्ये जॅकलिन फर्नांडिस हिची वर्णी लागणार ती..खुद्द याबाबत जॅकलिनलाच विचारल्यावर ही चर्चा खोटी असल्याचे तिने म्हटले आहे. ‘डॉन 3’मध्ये मी नाही. कालच मी मुंबईला परतली आणि मला ही बातमी ऐकायला मिळाली. आता ही बातमी कुठून पसरली मला ठाऊक नाही. एकंदर सांगायचे तर मी ‘डॉन 3’मध्ये नाहीय...असे जॅकलीनने स्पष्ट केलयं. शाहरूखसोबत काम करायला आवडेल का, असे विचारल्यावर निश्चितपणे जॅकलिनचा चेहरा उजळला. होय, मला नक्की आवडेल असे ती म्हणाली. आता जॅकलीनने स्वत:च ती‘डॉन 3’मध्ये नाही म्हटल्यावर प्रश्न संपलाच.. पण तरिही दुसरा प्रश्न हा आलाच. .शेवटी ‘डॉन 3’मध्ये जॅकलीन नाही तर असणार कोण?