या जुन्या गाण्यांची नवीन हिंदी सिनेमात चलती? जाणून घ्या कोणती जुनी गाणी ठरतायेत सुपरहिट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2016 17:35 IST2016-12-12T17:33:18+5:302016-12-12T17:35:32+5:30

ओल्ड इज गोल्ड असे म्हणतात. जुने तेच खरं आणि लाखमोलाचे असते. ही ओळ जुन्या हिंदी गाण्यांविषयी तंतोतंत लागू पडते. ...

Does this old song go into a new Hindi movie? Learn what superlatives are deciding which old songs are | या जुन्या गाण्यांची नवीन हिंदी सिनेमात चलती? जाणून घ्या कोणती जुनी गाणी ठरतायेत सुपरहिट

या जुन्या गाण्यांची नवीन हिंदी सिनेमात चलती? जाणून घ्या कोणती जुनी गाणी ठरतायेत सुपरहिट

्ड इज गोल्ड असे म्हणतात. जुने तेच खरं आणि लाखमोलाचे असते. ही ओळ जुन्या हिंदी गाण्यांविषयी तंतोतंत लागू पडते. जुनी गाण्यांमध्ये अशी काही जादू असते की ती आजही त्यांचे सूर आणि शब्द ओठांवर सहज रुळू लागतात. ही गाणी कानावर पडली की नास्टॅलजिक होणार नाही असा कुणीही शोधून सापडणार नाही. त्यामुळेच की काय बॉलीवुडच्या नव्याने रिलीज होणा-या सिनेमातही बॉलीवुडची हीच हिट गाणी वापरण्याचा ट्रेंड सुरु झाला आहे. ही गाणी रिमिक्स रुपात रसिकांच्या भेटीला येत आहेत. लवकरच ''तम्मा तम्मा'' हे 'थानेदार' सिनेमातील गाणे पुन्हा एकदा हिंदी सिनेमात ऐकायला मिळणार आहे. 'हम्टी शर्मा की दुल्हनियाँ' सिनेमातून रसिकांच्या भेटीला आलेली आलिया भट्ट आणि वरुण धवन यांची जोडी 'बद्रीनाथ की दुल्हनियाँ' या सिनेमातून पुन्हा एकत्र येत आहे. या सिनेमात आलिया आणि वरुण ''तम्मा तम्मा'' या गाण्यावर थिरकणार आहेत. नव्वदच्या दशकात 'थानेदार' सिनेमात संजय दत्त आणि धकधक गर्ल माधुरी दीक्षित यांच्यावर हे गाणे चित्रीत करण्यात आले होते. बप्पी लाहिरी यांचे संगीत असलेले हे गाणे सुपरडुपर हिट ठरले होते. आता याच गाण्याच्या तालावर आलिया आणि वरुण थिरकणार आहेत. सोशल मीडियावर दोघांनी फोटो शेअर करुन याची माहिती दिली आहे. काही गाण्याची जादू कधीही कमी होत नाही अशी पोस्ट त्यांनी केली आहे.



''तम्मा तम्मा'' या गाण्याप्रमाणे इतरही काही जुनी गाणी हिंदी सिनेमात वापरण्यात आली आहेत. 'हेट स्टोरी-2' मधील ''आज फिर तुमसे प्यार आया है'' हे गाणेही याच पठडीतील. हे गाणे जय भानुशाली आणि सुरवीन चावला यांच्यावर चित्रीत करण्यात आलं होतं. मात्र हे मूळ गाणे 1988 साली आलेल्या 'दयावान' या सिनेमात अभिनेता विनोद खन्ना आणि धकधक गर्ल माधुरी दीक्षित यांच्यावर चित्रीत करण्यात आलं होतं. त्यावेळी पंकज उधास आणि अनुराधा पौडवाल यांनी हे गाणे गायलं होतं. मात्र याच गाण्याला काहीशी वेगळी ट्रीटमेंट देत अरिजित सिंग आणि समीरा कोप्पीकर यांनी हे गाणे 'हेट स्टोरी-2' साठी गायलं.




असंच आणखी एक गाणे म्हणजे ''हर किसी को नहीं मिलता यहाँ प्यार जिंदगी में'' 1981 साली रुपेरी पडद्यावर झळकलेल्या जानबाज या सिनेमातील हे गाणे अभिनेता फिरोज खान आणि श्रीदेवी यांच्यावर चित्रीत करण्यात आले होते. नुकतेच काही वर्षांपूर्वी रुपेरी पडद्यावर झळकलेल्या 'बॉस' सिनेमातही हे गाणे वापरण्यात आले. खिलाडी अक्षय कुमार आणि सोनाक्षी सिन्हा यांच्यावर हे गाणे चित्रीत करण्यात आले.



अभिनेत्री बिंदू यांच्यावर चित्रीत करण्यात आलेले 1973 सालच्या अनहोनी सिनेमातील हंगामा हो गया हे गाणेही रसिकांच्या ओठावर आजही सहज रुळते. क्वीन या सिनेमात हेच ''हंगामा हो गया गाणे'' वापरण्यात आले होते. बॉलीवुडची क्वीन कंगणा राणौतवर हे गाणे चित्रीत करण्यात आले होते. शैतान सिनेमातही खोया खोया चाँद हे गाणे वापरण्यात आले होते.



'बॉम्बे वेल्वेट' या सिनेमात 60चे दशक दाखवण्यात आले होते. त्यामुळे या सिनेमात अभिनेत्री अनुष्कावर चित्रीत करण्यात आलेली बहुतांशी गाणी ही जुनी गाजलेली हिट गाणी होती. सीआयडी या गाजलेल्या सिनेमातील गीता दत्त यांनी गायलेलं ''जाता कहाँ है दिवाने'' हे गाणे बॉम्बे वेल्वेटमध्ये वापरण्यात आले होते. अरिजीत सिंगने थोडी हटकी ट्रिटमेंट देऊन या गाण्याला जॅझी करण्याचा प्रयत्न केला होता.याचप्रमाणे बिन तेरे सनम, पहला नशा, परदेसीयाँ... हे गाणेही रिमिक्स रुपात रसिकांसाठी आणण्यात आले होते. ही गाणी हिंदी सिनेमात वापरण्यात आली नसली तरी रिमिक्स अंदाजात ही गाणी हिट ठरली. त्यामुळे नवीन हिंदी सिनेमा असो किंवा रिमिक्स अल्बम जुन्या गाणी नव्या अंदाजात रसिकांना पसंत पडत आहेत. त्यामुळे म्हणावे लागेल की ओल्ड इज रियली गोल्ड.

Web Title: Does this old song go into a new Hindi movie? Learn what superlatives are deciding which old songs are

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.