​आमिर खानचा इशारा सलमान खानच्या ‘ट्युबलाईट’कडे तर नाही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2017 13:43 IST2017-05-21T08:13:38+5:302017-05-21T13:43:38+5:30

‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’च्या निमित्ताने आमिर खान एकदम फॉर्ममध्ये आलायं. आपल्या या आगामी चित्रपटाबद्दल तो कधी नव्हे इतका भरभरून बोलताना ...

Does Aamir Khan have Salman Khan's Tubalite? | ​आमिर खानचा इशारा सलमान खानच्या ‘ट्युबलाईट’कडे तर नाही?

​आमिर खानचा इशारा सलमान खानच्या ‘ट्युबलाईट’कडे तर नाही?

ग्स आॅफ हिंदोस्तान’च्या निमित्ताने आमिर खान एकदम फॉर्ममध्ये आलायं. आपल्या या आगामी चित्रपटाबद्दल तो कधी नव्हे इतका भरभरून बोलताना  दिसतोय. ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ हा चित्रपट ‘पायरेट्स आॅफ दी कॅरीयबियन’ या चित्रपटाची कॉपी आहे का? असा प्रश्न अलीकडे आमिरला विचारण्यात आला. यावर  आमिरने नकारार्थी उत्तर दिले. केवळ एवढेच नाही तर अतियश आक्रमकपणे आपली बाजू मांडली. ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ची कथा एक ओरिजनल कथा आहे. हा चित्रपट कुठल्याही हॉलिवूडपटाची कॉपी नाही, असे आमिर म्हणाला. तुम्ही अनेक अ‍ॅक्शन अ‍ॅडवेंचर चित्रपट पाहिलेत. याचा अर्थ हा नाही, की सगळेच कुठल्या तरी हॉलिवूड मुव्हीची कॉपी असतात, असेही आमिर म्हणाला. आता आमिरचा इशारा कुणाकडे होता, ते आम्हाला ठाऊक नाही. कदाचित सलमान खानच्या ‘ट्युबलाईट’कडे तर नाही? कारण सलमानचा ‘ट्युबलाईट’ हा चित्रपट ‘द लिटिल बॉय’ या हॉलिवूडपटापासून इंन्पायर आहे. आता आमिरचा इशारा खरोखरच सलमानकडे असेल तर मग सलमान यावर काय बोलतो, ते पाहणे इंटरेस्टिंग असेल.
खरे तर ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ हा चित्रपट सर्वप्रथम हृतिक रोशनला आॅफर झाला होता. तेव्हा हा चित्रपट ‘पायरेट्स आॅफ दी कॅरीयबियन’चा हिंदी रिमेक असल्याचे बोलले गेले होते. या चित्रपटात कुठलीही हिरोईन काम करायला तयार नव्हती. त्यामुळे हृतिकने हिरोईनची भूमिका अधिक दमदार करण्याचा सल्ला दिला होता. पण नंतर या चित्रपटाची स्क्रिप्ट आमिरकडे गेली आणि आमिरने स्क्रिप्टमध्ये कुठलाही बदल न सुचवता या चित्रपटासाठी होकार दिला. मग काय, हृतिकला कानोकान खबर न होता, या चित्रपटासाठी आमिरला साईन करण्यात आले.

Web Title: Does Aamir Khan have Salman Khan's Tubalite?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.