ड्रग्स घेवून तबला वाजवतेय काय, साराचा व्हिडीओ पाहून नेटीझन्स उडवतायेत तिची खिल्ली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2021 17:12 IST2021-03-02T17:04:12+5:302021-03-02T17:12:33+5:30
फनी अंदाजात साराने चे-यावरचे हावभाव पाहून कपिल शर्मानेही साराची आई अमृता सिंगला धन्यवाद तुम्ही इतका सुंदर प्रोडक्ट प्रोड्युस केल्याबद्दल म्हटले होते. यामुळेदेखील सारा तुफान ट्रोल झाली होती.

ड्रग्स घेवून तबला वाजवतेय काय, साराचा व्हिडीओ पाहून नेटीझन्स उडवतायेत तिची खिल्ली
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान तिच्या सुंदर फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. ती नेहमीच चाहत्यांसाठी नवनवीन फोटो शेअर करते.सारा अली खान सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे आणि ती नेहमी आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते. याशिवाय ती नेहमी सोशल मीडियावर फोटोही शेअर करत असते आणि या फोटोंतून ती प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडताना दिसते. मात्र नुकताच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यांत ती तबला वाजवताना दिसत आहे. साराला तबला वाजवण्याची आवड असल्याचे यावरुन पहिल्यांदाच समोर आले आहे. एकीकडे चाहते तिची तारिफ करत आहेत. तर दुसरीकडे तिची खिल्लीही उडवली जात आहे. काहींनी तर तिला ड्रेग्स घेवून वाजवते का ? अशीही कमेंट केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा साराला नेटीझन्सने ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
फनी अंदाजात साराने चे-यावरचे हावभाव पाहून कपिल शर्मानेही साराची आई अमृता सिंगला धन्यवाद तुम्ही इतका सुंदर प्रोडक्ट प्रोड्युस केल्याबद्दल म्हटले होते. यामुळेदेखील सारा तुफान ट्रोल झाली होती. ओव्हर एक्टींग की दुकान म्हणत अनेककदा साराला ट्रोल केले गेले आहे. त्यामुळे हा व्हिडीओ जुना असला तरी तो पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
त्यावेळचा तिचा हा व्हिडीओ आहे. या शोमध्ये हात जोडून रोहित शेट्टीकडे काम मागितल्याचे तिने सांगितले होते. नवाब सैफ अली खानची मुलगी रोहित शेट्टीपुढे हात पसरवत काम मागत आहे हे पाहताच माझ्याही डोळ्यात पाणी आले नवाबच्या मुलीला कामाची कसली आली गरज पण तरीही काम करण्याची मेहनत करण्याची साराची तळमळ पाहून तिला सिनेमात काम करण्याची संधी दिल्याचे रोहित शेट्टीनेही मान्य केले होते.