​‘रईस’ची दोन नवीकोरी पोस्टर्स तुम्ही पाहिलीतं का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2017 13:10 IST2017-01-02T12:50:24+5:302017-01-02T13:10:09+5:30

किंगखान शाहरूख खान याचा ‘रईस’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. ‘दिलवाले’, ‘फॅन’ असे एकापाठोपाठ एक असे दोन ...

Do you see two new posters of 'Rais'? | ​‘रईस’ची दोन नवीकोरी पोस्टर्स तुम्ही पाहिलीतं का?

​‘रईस’ची दोन नवीकोरी पोस्टर्स तुम्ही पाहिलीतं का?

ंगखान शाहरूख खान याचा ‘रईस’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. ‘दिलवाले’, ‘फॅन’ असे एकापाठोपाठ एक असे दोन सिनेमे आपटल्यानंतर शाहरूखला त्याच्या ‘रईस’ या सिनेमाकडून बºयाच अपेक्षा आहेत. त्यामुळेच ‘रईस’चे त्याने जोरदार प्रमोशन चालवले आहे. आज किंगखाने ‘रईस’चे दोन नवे पोस्टर त्याच्या सोशल अकाऊंटवर शेअर केलेत. हे पोस्टर्स पाहून तुमच्या तोंडून ‘व्वा’ निघाल्याशिवाय राहणार नाही.
‘रईस’चे शूटींग सुरु झाले तेव्हापासून हा सिनेमा चर्चेत आहे. आधी हा चित्रपट नको तितका लांबला. यानंतर पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हिच्यामुळे तो चर्चेत आला. माहिरा खान या चित्रपटात असणे म्हणजे वादाला निमंत्रण देण्यासारखे होते. मात्र शाहरूख एक चांगला अभिनेता असण्यासोबतच एक चांगला बिझनेसमॅन देखील आहे. त्याने अतिशय चतुराईने सगळी परिस्थिती सांभाळली. या मुद्यावर वाद उभा राहण्यापूर्वीच बॉलिवूडमध्ये पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याची मागणी करणारे मनसे प्रमुख राज ठाकरे यांची शाहरूखने भेट घेतली. माहिरा खान ‘रईस’च्या प्रमोशनचा भाग नसणार,याबद्दल राज ठाकरे यांना आश्वस्त करत शाहरूखने या वादाचा धुराडा शांत केला.

असो, तूतार्स वेळ आहे ती ‘रईस’चे नवे दोन पोस्टर्स बघण्याची. या पहिल्या पोस्टरमध्ये तुम्हाला दिसेल, शाहरूख खान आणि दुसºया पोस्टरमध्ये दिसणार शाहरूखसोबत इंटेन्स लूकमधील माहिरा.  आता यापैकी तुम्हाला कुठले आवडते, ते तुम्हीच ठरवा. राहुल ढोलकिया दिग्दर्शित आणि रितेश सिधवानी, फरहान अख्तर व गौरी खान निर्मित या चित्रपटात शाहरूख, माहिरा खानसोबत नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिकेत आहे. तेव्हा पाहुयात, ‘रईस’ची दोन नवीकोरी पोस्टर्स...!!  
 

 

Web Title: Do you see two new posters of 'Rais'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.