या बॉलिवूड सेलिब्रिटींचे विदेशातील आलिशान बंगले तुम्ही पाहिलेत काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2017 16:06 IST2017-08-02T10:36:54+5:302017-08-02T16:06:54+5:30

बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटी असे आहेत, ज्यांनी विदेशातही कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. शाहरूख खान, शिल्पा शेट्टी, अक्षयकुमार यांच्यासह अनेक ...

Do you see these Bollywood celebrities' luxury bungalows abroad? | या बॉलिवूड सेलिब्रिटींचे विदेशातील आलिशान बंगले तुम्ही पाहिलेत काय?

या बॉलिवूड सेलिब्रिटींचे विदेशातील आलिशान बंगले तुम्ही पाहिलेत काय?

बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटी असे आहेत, ज्यांनी विदेशातही कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. शाहरूख खान, शिल्पा शेट्टी, अक्षयकुमार यांच्यासह अनेक असे स्टार्स आहेत, ज्यांचे विदेशात आलिशान बंगले आहेत. आज आम्ही या स्टार्सच्या विदेशातील बंगल्यांची तुम्हाला झलक दाखविणार आहोत. हे आलिशान बंगले बघून तुम्ही थक्क व्हाल यात शंका नाही. 




शाहरूख खान

बॉलिवूडचा किंग शाहरूख खान याचा मुंबई येथील ‘मन्नत’ हा बंगला कदाचित तुम्हाला माहीत असेल. खरं तर मुंबईत आलेला पाहुणा शाहरूखच्या ‘मन्नत’ला भेट दिल्याशिवाय परत जात नाही. त्यामुळे ‘मन्नत’ शाहरूखच्या चाहत्यांसाठी नेहमीच आकर्षण राहिले आहे. ‘मन्नत’ व्यतिरिक्त शाहरूखचे दुबई आणि लंडनमध्येही आलिशान बंगले आहेत. दुबई येथील पाम जुमेराह स्थित शाहरूख खानचा व्हिला के-९३-१४००० स्क्वेअर फूट एवढ्या परिसरात बांधण्यात आला आहे. शाहरूखला हा बंगला पाम जुमेराहच्या डेव्हलपर्सने गिफ्ट केला होता. या बंगल्याची किंमत १८ कोटी रुपये आहे. या बंगल्यात दोन रिमोट कंट्रोल्ड गॅरेज, एक स्वतंत्र बीच आणि प्रायव्हेट पूल आहे. दुबई व्यतिरिक्त शाहरूखचा लंडन येथेही एक बंगला आहे. लंडनच्या सेंट्रल एरियात शाहरूखने एक अपार्टमेंट खरेदी केली आहे. या अपार्टमेंटची किंमत सुमारे १९५ कोटी रुपये आहे. 



शिल्पा शेट्टी
शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याने दुबई येथील बुर्ज खरिफा येथे एक अपार्टमेंट खरेदी केली आहे. राजने ही अपार्टमेंट शिल्पाला गिफ्ट केली आहे; मात्र यात फारशी स्पेस (दोन बेडरूम) नसल्याने त्यांनी पुढे ते विकून टाकले. त्याव्यतिरिक्त इंग्लंड, कॅनडा, लंडन आणि आॅक्सफोर्ड स्ट्रीट आॅफ लंडन येथे या दाम्पत्यांचे बंगले आहेत. इंग्लंडच्या वेब्रिज येथील सेंट जॉर्ज येथे ‘राज महल’ नावाचा यांचा एक बंगला असून, त्याची किंमत सुमारे १०७ कोटी रुपये आहे. 



अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चन
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चन या दाम्पत्याचा दुबई येथील जुमेराह गोल्फ इस्टेट येथे एक बंगला आहे. स्नॅच्युरी फॉल्स परिसरात असलेला हा बंगला या दाम्पत्याने ५४ कोटी रुपयांमध्ये खरेदी केला होता. 



अमिताभ बच्चन
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे मुंबई येथे पाच आलिशान बंगले आहेत. त्याव्यतिरिक्त त्यांनी पॅरिस येथेही एक घर खरेदी केले आहे. वास्तविक, सिटी आॅफ फॅशन या नावाने प्रसिद्ध असलेले पॅरिस अमिताभ यांचे फेव्हरेट ठिकाणांपैकी एक आहे. यामुळेच त्यांनी येथील घर पत्नी जया बच्चन यांना गिफ्ट केले आहे. 



सैफ अली खान आणि करिना कपूर
सैफ अली खान आणि करिना कपूर-खान या दाम्पत्याला स्ताद (स्वित्झरलॅण्ड) येथे हॉलिडे एन्जॉय करायला जाणे पसंत आहे. जेव्हा-केव्हा या दाम्पत्याला संधी मिळते, तेव्हा हे दोघे तेथे हॉलिडे एन्जॉय करायला जातात. त्यामुळेच त्यांनी स्ताद येथे एक आलिशान बंगला खरेदी केला आहे. 



अक्षयकुमार

अक्षयकुमार यांनीदेखील प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करणे पसंत आहे. त्यामुळेच अक्षय कॅनडाला त्याचे दुसरे घर समजतो. अक्षयने टोरॅण्टो येथे एक अपार्टमेंट नव्हे तर पूर्ण व्हिला खरेदी केला आहे. त्यामुळे तो या परिसरातील काही पॉश अपार्टमेंट आणि बंगल्यांचा मालक आहे. याव्यतिरिक्त मॉरिशस बीच येथेही त्याचा एक बंगला आहे. 



जॉन अब्राहम 

अभिनेता जॉन अब्राहम एक कलाकार आणि बिझिनेसमॅन आहे. लॉस एंजिलिस परिसरात त्याचा एक आलिशान बंगला आहे. जेनिफर एनस्टिन आणि अ‍ॅँजेलिना जोली यासारखे हॉलिवूड सेलिब्रिटी त्याचे शेजारी आहेत. 

Web Title: Do you see these Bollywood celebrities' luxury bungalows abroad?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.