तुम्हाला आठवतेय का 'चंदा'? अभिनयाव्यतिरिक्त 'नसीब अपना अपना'ची अभिनेत्री करतेय 'हे' काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 17:19 IST2025-10-01T17:17:02+5:302025-10-01T17:19:15+5:30
'Naseeb Apna Apna Movie : ऋषी कपूर आणि फराह नाझ यांचा १९८६ मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट 'नसीब अपना-अपना' आजही अनेकांना लक्षात आहे. या चित्रपटात या दोघांव्यतिरिक्त 'चंदा' नावाचे एक पात्र होते. तिची वाकडी वेणी असते आणि निरागसपणाने भरलेला तिचा अभिनय खूप गाजला होता.

तुम्हाला आठवतेय का 'चंदा'? अभिनयाव्यतिरिक्त 'नसीब अपना अपना'ची अभिनेत्री करतेय 'हे' काम
ऋषी कपूर आणि फराह नाझ यांचा १९८६ मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट 'नसीब अपना-अपना' आजही अनेकांना लक्षात आहे. मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाल्यानंतर, टीव्हीवरही हा चित्रपट खूप आवडला होता. या चित्रपटात ऋषी कपूर आणि फराह नाझ यांच्याव्यतिरिक्त 'चंदा' नावाचे एक पात्र होते. तिची वाकडी वेणी असते आणि निरागसपणाने भरलेला तिचा अभिनय खूप गाजला होता. पण तुम्हाला माहिती आहे का, आपल्या भोळेपणामुळे सर्वांची मनं जिंकणारी ही 'चंदा' म्हणजेच अभिनेत्री राधिका सरथकुमार आता भाजपची नेत्या बनली आहे.
अभिनेत्री राधिका सरथकुमार यांनी २००० सालीच राजकारणात प्रवेश केला होता. सुरुवातीला त्यांनी ऑल इंडिया अन्ना द्रविड मुनेत्र कड़कम (AIADMK) या पक्षाचे सदस्यत्व घेतले. त्यानंतर काही काळ त्यांनी द्रविड मुनेत्र कड़कम (DMK) आणि अखिल भारतीय समथुवा मक्कल काची (AISMK) या पक्षांसोबतही काम केले. मात्र, गेल्या वर्षी २०२४ मध्ये अभिनेत्री राधिका आणि त्यांच्या पतीने भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
अभिनेत्री यशस्वीरित्या सांभाळतेय राजकारण आणि व्यवसाय
विरुधुनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी राधिका यांना उमेदवारी देण्यात आली होती, परंतु या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. राधिका सरथकुमार केवळ राजकारणातच सक्रीय नाहीत, तर त्या व्यवसायाची जबाबदारीही सांभाळतात. अभिनेत्री इंस्टाग्रामवर खूप सक्रीय असून अनेकदा बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत पोस्ट शेअर करते. अलिकडेच त्यांनी ऋषी कपूर यांची लेक रिद्धिमा कपूरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या आणि एका पोस्टद्वारे पंतप्रधान मोदींचे आभार देखील मानले होते. सोशल मीडियावर त्यांना ५ लाख ५५ हजार लोक फॉलो करतात.
अभिनेत्रीने या भाषेतील सिनेमातही केलं काम
राधिका सरथकुमार यांनी केवळ हिंदीच नव्हे, तर तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड चित्रपटांमध्येही काम केले आहे. हिंदी सिनेमांमध्ये त्यांचे 'मेरा पती सिर्फ मेरा है', 'आज का अर्जुन' आणि 'हिम्मतवाला' हे चित्रपट विशेष गाजले. त्यांचा अखेरचा चित्रपट 'वानम कोट्टट्टम' हा होता, जो एक तमीळ एक्शन थ्रिलर चित्रपट होता. या चित्रपटात त्यांच्यासोबत विक्रम प्रभू यांनीही काम केले होते. सध्या राधिका त्यांचा व्यवसाय आणि राजकीय कारकीर्द दोन्ही सांभाळत आहेत. त्या आपल्या कुटुंबालाही पूर्ण वेळ देतात. त्यांनी अनेकवेळा कुटुंबासोबतचे संपूर्ण फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. राधिका यांना दोन मुले आहेत. त्यांनी २००४ मध्ये राहुल या मुलाला जन्म दिला. त्यांना एक मुलगीही आहे, जिचे लग्न झाले आहे.