आईच्या कडेवरच्या ‘या’ चिमुकलीला ओळखलं? बोल्डनेसमुळे आज सगळ्यांना करते ‘क्लीनबोल्ड’

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 09:00 AM2022-07-27T09:00:00+5:302022-07-27T08:00:02+5:30

Bollywood Actress: होय, या व्हायरल फोटोतील चिमुकली आज बॉलिवूडची मोठी अभिनेत्री आहे. अगदी हॉलिवूडमध्येही तिचं नाव आहे.  

Do you recognize 'this' little girl on her mother's side? Radhika Apte childhood pics | आईच्या कडेवरच्या ‘या’ चिमुकलीला ओळखलं? बोल्डनेसमुळे आज सगळ्यांना करते ‘क्लीनबोल्ड’

आईच्या कडेवरच्या ‘या’ चिमुकलीला ओळखलं? बोल्डनेसमुळे आज सगळ्यांना करते ‘क्लीनबोल्ड’

googlenewsNext

सेलिब्रिटींचे बालपणीचे फोटो हा चाहत्यांचा आवडता विषय. सोशल मीडियावर रोज नव्या सेलिब्रिटींच्या बालपणीचे फोटो व्हायरल होतात. सध्या एका अभिनेत्रीचे बालपणीचे असेच एक ना अनेक फोटो व्हायरल होत आहेत. होय, या व्हायरल फोटोतील चिमुकली आज बॉलिवूडची मोठी अभिनेत्री आहे. अगदी हॉलिवूडमध्येही तिचं नाव आहे.  बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्रीनं स्वबळावर बॉलिवूडमध्ये स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

अद्यापही तुम्ही तिला ओळखलं नसेल तर आम्ही सांगतो. ही चिमुरडी दुसरीतिसरी कुणी नसून राधिका आपटे (Radhika Apte) आहे. राधिकाचे बालपणीचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.  

राधिकाचा जन्म 7 सप्टेंबर  1985 रोजी तमिळनाडूमधील वेल्लोर येथे झाला होता. त्यानंतर तिचं कुटुंब पुण्यात स्थायिक झालं.  राधिकाने सुरुवातीचं शिक्षण  पुण्यात घेतलं.  फर्ग्युसन महाविद्यालयातुन तिने अर्थशास्त्र तसेच गणित विषयात पदवी घेतली. राधिकाने हिंदी चित्रपटाशिवाय मल्याळम, बंगाली, मराठी व तमीळ चित्रपटात काम केलं आहे. राधिका प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत व्यक्त करत असते. त्यामुळे बऱ्याचदा ट्रोलही होते.


 
चित्रपटांशिवाय राधिका तिच्या लव्ह अफेयर्समुळे चर्चेत राहिली होती. कधीकाळी राधिकाचं नाव तुषार कपूरसोबत जोडलं गेलं होतं. मात्र  2012 साली तिने गुपचूप लग्न केलं.  लंडनमध्ये स्थायिक  व्हायोलिनवादक व संगीतकार बेनेडिक्ट टेलरसोबत तिने लग्नगाठ बांधली.

राधिका व बेनेडिक्ट 2011 मध्ये पहिल्यांदा भेटले होते. डान्स शिकण्यासाठी राधिका लंडमध्ये गेली होती. इथेच त्यांची ओळख झाली आणि लवकरच राधिका व बेनेडिक्ट एकत्र राहू लागले. 2012 मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा छोटाशा विवाह सोहळा पार पडला होता. 

Web Title: Do you recognize 'this' little girl on her mother's side? Radhika Apte childhood pics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.