ओळखलंत का हिला?, वडिलांच्या मांडीवर बसलेली ही क्युट मुलगी आज आहे इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2023 03:14 PM2023-09-21T15:14:16+5:302023-09-21T15:30:01+5:30

अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो पाहून लोकांना तिला ओळखणं कठीण जातंय.

Do you know this cute girl, today a famous face in the industry | ओळखलंत का हिला?, वडिलांच्या मांडीवर बसलेली ही क्युट मुलगी आज आहे इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरा

ओळखलंत का हिला?, वडिलांच्या मांडीवर बसलेली ही क्युट मुलगी आज आहे इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरा

googlenewsNext

अनेक कलाकार मंडळी स्वतःच्या बालपणीचे फोटो सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांबरोबर शेअर करताना पाहायला मिळतात. लहानपणीचे ते गोड आणि निरागस फोटो पाहून आपल्याला स्वतःचेच कौतुक वाटत असते. एवढेच नाही तर आपले जुने फोटो पाहून आपल्याला पुन्हा लहान झाल्यासारखे वाटते. परत एकदा बालपण अनुभवायला मिळाले असते तर किती बरे झाले असते असे प्रत्येक व्यक्तीला वाटत असते. या फोटोतील अभिनेत्रीला ओळखलंत का? 

बिग बॉसमधून प्रसिद्ध झालेल्या एका अभिनेत्रीचा लहानपणीचा फोटो चर्चेत आला आहे. बिग बॉसमधून प्रसिद्ध झालेल्या शहनाज गिलचा बालपणीचा एक गोंडस फोटो व्हायरल होत आहे. शहनाज टीव्हीवरील एक क्युट अभिनेत्री आहे . पंजाबची कतरिना कैफ म्हणून सुरुवातील शहनाजची ओळख निर्माण झाली होती. काही महिन्यांपूर्वी शहनाजच्या चाहत्यांनी तिच्या बालपणीचा एक फोटो शेअर केला होता. या फॅमिली फोटोमध्ये शहनाज वडिलांच्या मांडीवर बसलेली दिसत आहे. तिने ब्लू जीन्स आणि टर्टल नेक स्वेटर घातलेला आहे. तर दुसरीकडे शहनाजचा भाऊ शाहबाज आईच्या मांडीवर बसला आहे. हा फॅमिली फोटो व्हायरल झाला आहे.फोटोतील शहनाजच्या चेहऱ्यावरचा निरागसपणा चाहत्यांना भावला आहे.


बिग बॉसनंतर शहनाजमध्ये खूप चेंजस झाले आहेत. तिचं झालेलं ट्रान्सफोर्मेशन पाहून सगळेच थक्क झाले होते. किसी का भाई किसी की जान या सलमान खानच्या सिनेमातून तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 

Web Title: Do you know this cute girl, today a famous face in the industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.