तुम्हाला माहीत आहे का... या अभिनेत्यांनी केले आहे आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या अभिनेत्रींशी लग्न!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2016 17:31 IST2016-12-14T17:31:24+5:302016-12-14T17:31:24+5:30
किश्वर मर्चंट तिच्यापेक्षा वयाने आठ वर्षं लहान असलेल्या सुयश रायसोबत लग्न करत असल्याने तिची खिल्ली सोशल मीडियावर काहीजणांनी उडवली ...
.jpg)
तुम्हाला माहीत आहे का... या अभिनेत्यांनी केले आहे आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या अभिनेत्रींशी लग्न!
क श्वर मर्चंट तिच्यापेक्षा वयाने आठ वर्षं लहान असलेल्या सुयश रायसोबत लग्न करत असल्याने तिची खिल्ली सोशल मीडियावर काहीजणांनी उडवली आणि याला सुयशने सडेतोड उत्तरदेखील दिले. पण आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या महिलेसोबत लग्न करणारा सुयश हा पहिलाच अभिनेता नाहीये. इंडस्ट्रीतील अनेकांनी आपल्या वयापेक्षा कित्येक मोठ्या असलेल्या अभिनेत्रींशी लग्न केले आहे आणि ते आपल्या संसारात सुखीदेखील आहेत.
अभिषेक बच्चन - ऐश्वर्या राय
अभिषेक आणि ऐश्वर्याचे लग्न 2007मध्ये झाले, ऐश्वर्या अभिषेकपेक्षा दोन वर्षांनी मोठी आहे. पण त्यांचा संसार अतिशय आनंदात सुरू असून त्यांना एक मुलगीदेखील आहे.
![aishwarya rai and abhishek bachchan]()
शिरिष कुंदर - फरहा खान
शिरिष आणि फरहाची ओळख मैं हू ना या चित्रपटाच्या सेटवर झाली आणि ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. त्या दोघांमध्ये फरहा आठ वर्षांनी मोठी आहे. फरहा शिरिषसोबत प्रचंड खूश असून दुसरा जन्म असतो का याची मला कल्पना नाही, पण असे असेल तर मला पुढच्या जन्मीदेखील शिरिषसोबत लग्न करायचे आहे असे ती अनेकवेळा सांगते.
![farah khan and shirish kunder]()
आदित्य पांचोली - झरीना वहाब
तुमच्या कुटुंबीयांचा तुम्हाला पाठिंबा असल्यास वयातील फरक हा कधीच तुमच्या नात्यात आडवा येत नाही असे आदित्य पांचोलीचे म्हणणे आहे. झरिना आदित्यपेक्षा सहा वर्षांनी मोठी आहे. झरिना आणि आदित्यमध्ये अनेक वेळा खटके उडल्याच्या बातम्या ऐकायला मिळाल्या आहेत. पण आजही ते दोघे एकमेकांसोबत आहेत.
![aditya pancholi zarina wahab]()
कुणाल खेमू - सोहा अली खान
सोहा अली खान आणि कुणाल खेमू यांच्यात सोहा पाच वर्षांनी मोठी आहे. ढूंढते रह जाओगे या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. अनेक वर्षांच्या नात्यानंतर त्यांनी 2015मध्ये लग्न केले.
![kunal khemu and soha ali khan]()
परमित सेठी - अर्चना पुरणसिंग
अर्चनाचा घटस्फोट झाल्यानंतर एका मित्राच्यामार्फत अर्चना आणि परमित दोघांची ओळख झाली. अर्चनाला पाहाताना तिच्यापेक्षा वयाने सात वर्षांनी लहान असलेला परमित तिच्या प्रेमात पडला. ते दोघे लग्नाआधी चार वर्षं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होते. सुरुवातीला परमितच्या कुटुंबीयांचा त्यांच्या नात्याला विरोध होता. आज त्यांच्या लग्नाला 20 वर्षांहूनही अधिक काळ झालेला आहे.
![Archana Puran Singh and Parmeet Sethi]()
बख्तियार इराणी - तनाझ इराणी
तनाझ बख्तियारपेक्षा सात वर्षांनी मोठी असून तिचे पहिले लग्न झालेले होते. तिला एक मोठी मुलगीदेखील होती. बख्तियारने तनाझसोबत लग्न करू नये असे त्याच्या घरातल्यांना वाटत होते. पण बख्तियार त्याच्या निर्णयावर ठाम राहिला आणि आपला निर्णय कशाप्रकारे योग्य आहे हे त्याने त्याच्या कुटुंबीयांना पटवून दिले.
![bakhtiyar irani tanaz irani]()