सलमान खान आणि आमिर खानसोबत काम केलेल्या या अभिनेत्रीला ओळखलात का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2018 15:01 IST2018-04-21T09:10:14+5:302018-04-21T15:01:15+5:30
या अभिनेत्रीला आपण सलमान शाहरुख आणि आमिर बरोबर बरेचवेळा काम करताना पाहिले असेल. पण ह्याच अभिनेत्रीला तुम्ही ह्या अवस्थेत कधीच ...

सलमान खान आणि आमिर खानसोबत काम केलेल्या या अभिनेत्रीला ओळखलात का?
य अभिनेत्रीला आपण सलमान शाहरुख आणि आमिर बरोबर बरेचवेळा काम करताना पाहिले असेल. पण ह्याच अभिनेत्रीला तुम्ही ह्या अवस्थेत कधीच पाहिले नसेल. बॉलिवूड मधील टॉपची अभिनेत्री जीने आताच चित्रपटात भूताची भूमिका साकारली आहे. हो आम्ही बोलतोय क्रिकेटपटू विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा बद्दल. तुम्ही हा फोटो बघून आश्चर्यचकित झाला असाल.
आम्हाला मिळालेल्या फोटोनुसार अनुष्का शर्मा एका वृद्ध महिलेच्या भूमिकेमध्ये दिसत आहे. अजून हे स्पष्ट झाले नाही की तिने हा गेटअप चित्रपटासाठी केला आहे की जाहिरातीसाठी ते. नुकतेच अनुष्काने 'परी' चित्रपटात एका भूताच्या भूमिका साकारली होती. लवकरच ती वरूण धवनसोबत 'सुई धागा' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात वरुण धवन टेलरच्या भूमिकेत झळकणार असून 'मौजी' असं त्याच्या व्यक्तीरेखेचे नाव असेल.दुसरीकडे अनुष्का कपड्यांवर नक्षीकाम (एम्ब्रॉयडरी) करणा-या ममताच्या भूमिकेत झळकणार आहे.'मेड इन इंडिया' अशी टॅगलाइन असलेल्या या सिनेमाची कथा मध्य प्रदेशात रंगणार आहे. या ठिकाणी बहुतांशी नागरिक येण्या जाण्यासाठी सायकलचा वापर करतात. त्यामुळे सुई धागा सिनेमात वरुण-अनुष्का सायकलवर फिरताना पाहायला मिळणार आहेत. शरत कटारिया 'सुई धागा' या सिनेमाचं दिग्दर्शन करत असून मनीष शर्मा सिनेमाचे निर्माते आहेत.यशराज बॅनरचा हा सिनेमा गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर २८ सप्टेंबरला रसिकांच्या भेटीला येणार आहे.
अनुष्का शाहरुख खानसोबत झिरो या चित्रपटात देखील दिसणार आहे. शाहरुख खान या चित्रपटात एका बुटक्या व्यक्तीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटातील शाहरूखची व्यक्तीरेखा ‘गेम आॅफ थ्रोन्स’ या इंग्रजी सीरिजमधील टीरिनयल लेनिस्टर या पात्रावर आधारित असल्याचे सांगितले जात आहे. म्हणजेच, ही बुटकी व्यक्ती दुस-या लोकांमध्ये प्रेम वाढवून त्यांच्यातील दुवा ठरेल. ‘गेम आॅफ थ्रोन्स’ प्रेक्षकांच्या आवडीची शृंखला आहे. या चित्रपटात अनेक व्हिज्युअल इफेक्ट्स दिसणार आहेत.