‘काम करा, आनंदी राहा’- कविता बडजात्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2017 19:06 IST2017-09-19T13:36:01+5:302017-09-19T19:06:01+5:30

अबोली कुलकर्णी   कविता बडजात्या हे टीव्ही, चित्रपट इंडस्ट्रीतील एक मोठ्ठं नाव. राजश्री प्रॉडक्शन्ससोबत अनेक वर्ष काम केल्यानंतर अशातच ...

'Do work, stay happy' - Poetry bigger | ‘काम करा, आनंदी राहा’- कविता बडजात्या

‘काम करा, आनंदी राहा’- कविता बडजात्या

ong>अबोली कुलकर्णी
 
कविता बडजात्या हे टीव्ही, चित्रपट इंडस्ट्रीतील एक मोठ्ठं नाव. राजश्री प्रॉडक्शन्ससोबत अनेक वर्ष काम केल्यानंतर अशातच त्यांनी स्वत:ची प्रोडक्शन कंपनी सुरू केली. निर्माता म्हणून त्यांनी त्यांचा प्रवास सुरू केला. अ‍ॅण्ड टीव्हीवर २५ सप्टेंबरपासून ‘हाफ मॅरेज’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यानिमित्ताने निर्माता बनण्याच्या कविता बडजात्या आणि त्यांचा भाऊ कौशिक यांच्या प्रवासाविषयी त्यांच्याशी मारलेल्या या गप्पा...

* ‘हाफ मॅरेज’ या टीव्ही शो विषयी काय सांगशील?
- अ‍ॅण्ड टीव्हीवर सुरू होणारा ‘हाफ मॅरेज’ हा टीव्ही शो आमच्यासाठी खूप स्पेशल आहे. आम्ही ‘कॉन्शियस ड्रीम्स’ नावाची एक कंपनी सुरू केली असून त्याअंतर्गत असलेला हा पहिलाच टीव्ही शो आहे. त्यामुळे आम्ही खूप एक्सायटेड आहोत. शोबद्दलचे वेगवेगळे व्ह्यूज आम्ही एक्सचेंज करत आहोत. यातून आम्हाला हे कळालं आहे की, ही कन्सेप्ट लोकांना आवडते आहे. चित्रपटाचे कथानक ही एक लव्हस्टोरी आहे. दोन कुटुंबाची कथा यात साकारण्यात आली आहे. 

* प्रेक्षकांनी  कविता बडजात्या यांना एका निर्मात्याच्या रूपातच पाहिले आहे. मात्र, ती खऱ्या आयुष्यात कशी आहे?
- आम्हा निर्मात्यांना पडद्याच्या मागे राहूनच आमचे काम करावे लागते. मीडियासमोर येताना आम्ही खूपच कॉन्शियस होतो. खरंतर एक व्यक्ती म्हणून मी खूपच साधी आहे. कुटुंबात राहणं, घरच्यांवर प्रेम करणं, आई-वडिलांसोबत वेळ घालवणं मला आवडतं. ‘काम करा, आनंदी राहा’ हाच जीवनाचा मंत्र घेऊन मी जगते. 

* निर्माता बनण्याचा प्रवास कसा होता? कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागला?
- खरंतर ‘राजश्री प्रॉडक्शन्स’ सोबत आमचा संबंध असल्याने आम्हाला फारसा स्ट्रगल करावा लागला नाही. पहिले दहा वर्ष काम करत असताना आम्हाला फारशा काही अडचणी आल्या नाही. पण, हो जेव्हा आम्ही स्वत:चा प्रवास सुरू केला तेव्हा अडचणींची जाणीव होऊ लागली. खूप गोष्टींना एक निर्माता म्हणून आम्हाला सामोरं जावं लागतं. थोडक्यात काय तर, निर्माता बनण्याचा प्रवास काही सोपा नव्हता.

* टीव्ही, चित्रपट या दोन्हींसाठी तुम्ही काम केले आहे. काम करत असताना दोन्हींमध्ये काय फरक जाणवला?
- टीव्ही आणि चित्रपट या दोन्हींमध्ये काम करण्यात आपापली वेगळीच एक मजा असते. काम करण्याच्या प्रोसेसमध्येही खूप फरक असतो. चित्रपट हा ‘लार्जर दॅन लाईफ’ असतो; तर टीव्ही ‘लाऊडर दॅन लाईफ’ असतो. चित्रपटांत बरेच प्रयोग तुम्हाला करता येतात. मात्र, टीव्हीमध्ये तसं होत नाही. तुम्हाला प्रेक्षकांसाठी दररोज एपिसोड्स हे दाखवावेच लागतात. 

* तू एक चांगली गायिका, कथ्थक डान्सरही आहेस. मग यात करिअर करण्याचा विचार केला नाही का?
-  शाळेत असताना पासून मला गायन, कथ्थक यांची खूप आवड होती. आई-वडिलांनी माझ्यातील चुणूक ओळखून या गुणांना प्रोत्साहन द्यायचे ठरवले. मी अनेक ठिकाणी कार्यक्रमही केले. मात्र, नंतर मग काळाच्या ओघात सगळं हळूहळू सुटत गेलं. पण, आजही मला या दोन कलांचा उपयोग होतो.

* तुझ्या आयुष्यातील प्रेरणास्थान कोण आहे?
- आपण आपल्या आयुष्यात लहान असल्यापासून बऱ्याच गोष्टी शिकत जातो. आई-वडील, भाऊ-बहिण यांच्याकडूनही आपण बऱ्याच गोष्टी शिकतो. खरंतर, आयुष्य हेच आपले सर्वांत मोठे प्रेरणास्थान असते. आयुष्य आपल्याला विविध खाचखळग्यांची ओळख करून देत असतो. 

Web Title: 'Do work, stay happy' - Poetry bigger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.