सौंदर्याची मल्लिका आणि लाखो हृदयाची धडकन बनलेली नोरा फतेही आहे इतक्या कोटींची मालकीण, जाणून संपत्तीचा आकडा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 11:21 AM2021-06-22T11:21:08+5:302021-06-22T11:23:06+5:30

जगभरात आज नोरा फेतहीचे चाहते आहेत.तिच्याविषयी जाणून घेण्याची तिच्या चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते.  

Do u know Nora Fatehi’s Wealth ? Here is details | सौंदर्याची मल्लिका आणि लाखो हृदयाची धडकन बनलेली नोरा फतेही आहे इतक्या कोटींची मालकीण, जाणून संपत्तीचा आकडा

सौंदर्याची मल्लिका आणि लाखो हृदयाची धडकन बनलेली नोरा फतेही आहे इतक्या कोटींची मालकीण, जाणून संपत्तीचा आकडा

googlenewsNext

नोरा फतेही म्हटलं की रसिकांच्या काळजाची धडकन.नोराच्या मादक अदा, बोल्ड अंदाज आणि दिलखेचक नृत्य यामुळं रसिक सारं काही विसरुन जातात. त्यामुळेच नोराच्या प्रत्येक आयडट डान्सचीही तितकीच उत्सुकता तिच्या चाहत्यांना असते. नोरा फतेही मोरक्कन वंशाची अभिनेत्री आहे. 2014 मध्ये दिग्दर्शक कमल सदाना यांच्या 'रोर : टाइगर्स ऑफ द सुंदरवन' या सिनेमाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.सौंदर्याची मल्लिका आणि लाखो हृदयाची धडकन बनलेली नोरा आता निर्मांत्याचीही पहिली पसंती बनली आहे. तिच्या मेहनतीने आज तिने इंडस्ट्रीत तिचे स्थान निर्माण केले आहे. जगभरात आज नोराचे चाहते आहेत. तिच्याविषयी जाणून घेण्याची तिच्या चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते.  

नोराच्या संपत्तीबाबत फारसं कुणाला माहिती नाही.  रसिकांच्या गळ्यातील ताईत बनलेली नोरा कोट्यावधीची मालकीण आहे.  जाहिरात करण्यासाठी नोरा 5 लाख रुपये मानधन घेते तर एका गाण्यासाठी 40 लाख रुपये मानधन आकारते. जवळपास 12 कोटी इतकी नोराकडे संपत्ती असल्याचे बोलले जाते. नोरा फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर कन्नड आणि तेलगू इंडस्ट्रीतही प्रचंड लोकप्रिय आहे. तिच्याकडे सतत सिनेमाच्या ऑफर्स असल्यामुळे सर्वात बिझी अभिनेत्री नोरा बनली आहे. 


सोशल मीडियावर नोरा फेतेहीची फॉलोअर्सची संख्याही मोठी आहे. सोशल मीडियावर तिचे आगामी प्रोजेक्ट्स व्हिडीओ आणि फोटोही ती शेअर करत असते. तिचा प्रत्येक अंदाज चाहत्यांच्या मनाचा ठाव घेतो. तिचे फोटो पाहून चाहते फुल ऑन फिदा होतात. नेहमीच तिच्या सौंदर्यांवर चाहते भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स करत कौतुकाचा वर्षावही करत असतात.

Web Title: Do u know Nora Fatehi’s Wealth ? Here is details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.