​स्वत:ला देव समजू नकोस; सुनील ग्रोवरने कपिल शर्माला दिला सल्ला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2017 12:12 IST2017-03-21T05:30:22+5:302017-03-21T12:12:04+5:30

कॉमेडियन कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यातील वाद आता जगजाहिर झाला आहे. आॅस्टेलिया दौºयावरून परतत असताना कपिल दारूच्या नशेत ...

Do not think of yourself as God; Sunil Grover gives advice to Kapil Sharma | ​स्वत:ला देव समजू नकोस; सुनील ग्रोवरने कपिल शर्माला दिला सल्ला!

​स्वत:ला देव समजू नकोस; सुनील ग्रोवरने कपिल शर्माला दिला सल्ला!

मेडियन कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यातील वाद आता जगजाहिर झाला आहे. आॅस्टेलिया दौºयावरून परतत असताना कपिल दारूच्या नशेत सुनीलला नाही नाही ते बोलला होता. तू माझा नोकर आहेस, इथपर्यंत तो बोलून गेला होता. कपिलचे हे शब्द सुनीलच्या चांगलेच जिव्हारी लागले आहेत. काल कपिलने या संपूर्ण प्रकरणावर सावरासावर करण्याचा प्रयत्न केला. सुनील माझ्या मोठ्या भावासारखा आहे. इतके तर चालतच राहणार, अशा शब्दांत त्याने सुनीलची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. कपिलच्या या मनधरणीनंतर सुनील काय बोलतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. त्यानुसार, सुनीलने आपली बाजू मांडली आहे. केवळ बाजूच नाही तर कपिल, माणसांचा मान राखायला शिक, असा सल्लाही दिला आहे.

ALSO READ : ​ सुनील ग्रोवरसोबतच्या वादावर बोलला कपिल शर्मा; म्हणे,‘इतना तो चलता है...’

सुनीलने ट्विट करून लिहिले आहे की, भाई, होय तू मला खूप हर्ट केले आहेस. तुझ्यासोबत काम करून खूप शिकायला मिळाले. फक्त एक सल्ला द्यायचा आहे, जनावरांसोबतच माणसांचाही मान राखायला सुरूवात कर. तुझ्यासारखे सगळेच यशस्वी नसतात. तुझ्यासारखी कला सर्वांमध्येच नाहीये. जर सगळेच तुझ्यासारखे टॅलेंटेड असते तर तुला कुणी का विचारले असते? त्यामुळे अशा लोकांचे आभार मान. सोबतच जे लोक तुला योग्य गोष्ट शिकवतात त्यांना शिव्या देणे सोड. ज्या महिलांना तुझ्या स्टारडमशी काहीही देणेघेणे नाही, त्यांच्यासमोर  घाणेरडे शब्द बोलू नकोस. हा तुझा शो आहे आणि तू कधीही कुणालाही बाहेर फेकू शकतो, याची जाणीव करून दिल्याबद्दल धन्यवाद. तू तुुझ्या फिल्डमध्ये बेस्ट आहे पण स्वत:ला देव समजू नको. स्वत:ची काळजी घे! तुला अधिक यश मिळो!


सुनील गोव्हरच्या या ओपन लेटरला कपिल शर्माने अपेक्षेनुसार लगेच उत्तर दिले. मी आता तुझ्यावर आधीपेक्षा जास्त प्रेम करतो आणि सायंकाळी तुला भेटायला तुझ्या घरी येतो, असे टिष्ट्वट त्याने केले. आता कपिल सुनीलला भेटायला गेला की नाही आणि गेलाच तर या भेटीत काय झाले, ते लवकरच सांगू.

 

Web Title: Do not think of yourself as God; Sunil Grover gives advice to Kapil Sharma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.