केवळ दिसण्यावर जाऊ नका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2016 17:49 IST2016-06-11T12:19:39+5:302016-06-11T17:49:39+5:30

अभिनेत्री कल्की कोचेलिन हिच्या मते चित्रपट उद्योगाला सौंदर्याची व्याख्या बदलण्याची गरज आहे. नवीन मुलींना आपल्या दिसण्याकडे अधिक लक्ष द्यावे ...

Do not just go to the scene | केवळ दिसण्यावर जाऊ नका

केवळ दिसण्यावर जाऊ नका

िनेत्री कल्की कोचेलिन हिच्या मते चित्रपट उद्योगाला सौंदर्याची व्याख्या बदलण्याची गरज आहे.
नवीन मुलींना आपल्या दिसण्याकडे अधिक लक्ष द्यावे लागते, पर्यायाने त्या कायम तणावात असतात. चांगले दिसणं ही गोष्ट खूप अवघड आहे. परंतु आपल्याकडे कृत्रिम सौंदर्याची अनेक उदाहरणे आहेत. मी पारंपरिक दिसत नाही. रिचा चढ्ढाही तशीच आहे. मला वाटते आपण सौंदर्याची विविधता साजरी केली पाहिजे. 
या उद्योगातील काही लोकांमुळे आपल्याला चाकूच्या टोकावर जावे लागले, असे रिचा चढ्ढाने नुकतेच म्हटले होते. त्याबाबत बोलताना कल्की म्हणाली, आपल्या दिसण्यात बदल झाला पाहिजे, या भावनेमुळे काही जण सातत्याने प्रभावित झालेले असतात. जेव्हा एखादी १८ वर्षाची मुलगी बॉलीवूडमध्ये येते आणि तु चांगली दिसत नाहीत असे तिला म्हटले गेले तर तिच्यावर खूप सारा दबाव येतो.’
‘आपल्या व्यक्तीमत्वात बदल करण्याविषयी बºयाचवेळा सांगण्यात आले, परंतु आपल्या मते अभिनय सर्व काही सांगेल’ असे कल्की म्हणाली.

Web Title: Do not just go to the scene

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.