Diwali 2018 अमिताभ बच्चनपासून सलमान खानपर्यंत...अशी साजरी झाली बॉलिवूडची दिवाळी !!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2018 11:03 IST2018-11-08T11:00:59+5:302018-11-08T11:03:14+5:30
देशभर उत्साहात दिवाळी साजरी झाली. बॉलिवूडही याला अपवाद नाही. बॉलिवूडमध्येही धूमधडाक्यात दिवाळसण साजरा झाला.

Diwali 2018 अमिताभ बच्चनपासून सलमान खानपर्यंत...अशी साजरी झाली बॉलिवूडची दिवाळी !!
देशभर उत्साहात दिवाळी साजरी झाली. बॉलिवूडही याला अपवाद नाही. बॉलिवूडमध्येही धूमधडाक्यात दिवाळसण साजरा झाला. सोनम कपूर-आनंद अहुजा यांनी लग्नानंतरची आपली पहिली दिवाळी विदेशात साजरी केली तर अनेकांनी मुंबईत दिवाळी साजरी केली.
बच्चन कुटुंबाकडे धडाक्यात दिवाळी साजरी झाली. अमिताभ बच्चन, जया बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, आराध्या बच्चन आदींनी जुहूस्थित बंगल्यात दिवाळी साजरी केली. यावेळी अमिताभ व जया नातीसोबत फटाके उडवतांनाही दिसलेत.
सोनम कपूर व आनंद अहुजा यांनी लंडनमध्ये लक्ष्मीपूजन केले. लक्ष्मीपूजनापूर्वी गणेशाची पूजा करताना सोनम दिसतेय.
कंगना राणौतने यंदाची दिवाळी मनाली येथील आपल्या बंगल्यात साजरी केली. बहीण रंगोलीसोबत तिने असे सेलिबे्रशन केले.
लग्नानंतरची विराट कोहली व अनुष्का शर्माची ही पहिली दिवाळी. दिवाळीच्या मुहूर्तावर दोघांनीही हा फोटो शेअर केला.
दिवाळीच्या दिवशी करण जोहरने मुलगा यशसोबतचा फोटो शेअर केला. यावेळी दोघेही मॅचिंग आऊटफिटमध्ये दिसलेत.
वरूण धवनने आपल्या कुटुंबासोबत अशी मस्त दिवाळी सेलिब्रेट केली.
अर्पिता खानने दिलेल्या दिवाळी पार्टीत सलमान आपल्या कुटुंबासोबत पोहोचला.
कॅटरिनाने अशी दिवाळी साजरी केली.