सोनू निगम आणि भूषण कुमारमधील वाद मिटला; ‘अच्छा सिला दिया’ गाण्याचं नवं व्हर्जन ‘बिटर बेट्रेयल्स’ ची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 12:29 PM2023-09-28T12:29:16+5:302023-09-28T12:33:07+5:30

सोनू निगम आणि टी-सीरिजचे प्रमुख भूषण कुमार यांच्यातील वाद मिटला.

Dispute between Sonu Nigam and Bhushan Kumar resolved | सोनू निगम आणि भूषण कुमारमधील वाद मिटला; ‘अच्छा सिला दिया’ गाण्याचं नवं व्हर्जन ‘बिटर बेट्रेयल्स’ ची घोषणा

Sonu nigam - Bhushan Kumar

googlenewsNext

सोनू निगम हा बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक आहे. त्यानं आपल्या सुरेल आवाजाने लोकांना वेड लावलंय. आपल्या संघर्ष आणि मेहनतीच्या जोरावर सोनूने आज संगीत विश्वात त्याचा ठसा उमटवला आहे. तो गेल्या काही वर्षांपासून वादाचाही भाग राहिला आहे. त्यामुळे सोनू अन् वाद याच्यांत जवळचे संबध असल्याचं बोललं जात.  सोनू निगम आणि टी-सीरिजचे प्रमुख भूषण कुमार यांच्यातील वाद तर सर्वश्रूत आहे. पण, आता दोघे एकत्र आले असून अखेर आता तीन वर्षांनंतर त्यांच्यातील वैर मिटले. 

सोनू निगम आणि प्रमुख भूषण कुमार यांनी नव्या प्रोजेक्टची घोषणाही केली आहे. सोनू निगम आणि भूषण कुमार यांनी अधिकृतपणे सोशल मीडियावर 'बिटर बिट्रेयल्स' नावाच्या संगीत असाइनमेंटची घोषणा केली. 29 सप्टेंबर रोजी हा ट्रॅक टी-सीरीजच्या यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित होणार आहे. 

शिवाय, सोनू निगम आणि टी-सीरीजचे नाते जुनं आहे. सोनूने टी-सीरीजसाठी अनेक गाणी गायली आहेत.  मोहम्मद रफी यांच्या गाण्याचा एक अल्बम 'रफी की यादे' मध्ये सोनू निगमने काम केलं होतं. सोनूच्या आवाजमध्ये रफी यांची गाणी लोकांना खूप आवडली. याद्वारे सोनूला इंडस्ट्रीमध्ये ओळख मिळाली होती. 

दरम्यान, 2020 मद्ये सोनू निगमने बॉलिवूड म्युझिक इंडस्ट्रीवरही खुप टीका केली होती. सोनूने भूषण कुमार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्याने भुषण कुमार यांना 'म्युझिक माफिया' असेही म्हटले होते. त्यानंतर भूषण कुमारची पत्नी दिव्या खोसला कुमारनेही सोनू निगमला सडेतोड उत्तर दिले होते. दोघांमधला वाद चांगलाच चर्चेत आला होता. मात्र, आता दोघे पुन्हा एक झाले आहेत. 

Web Title: Dispute between Sonu Nigam and Bhushan Kumar resolved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.