दिग्दर्शकांच्या बायका रमतात या कामात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2017 13:53 IST2017-08-24T08:23:14+5:302017-08-24T13:53:14+5:30

जेव्हा एखादा चित्रपट हिट होतो तेव्हा कलाकार बरोबर त्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाची सुद्धा प्रशंसा केली जाते .आपण नेहमीच कलाकारांच्या खाजगी ...

The director's wife is going to do this work | दिग्दर्शकांच्या बायका रमतात या कामात

दिग्दर्शकांच्या बायका रमतात या कामात

व्हा एखादा चित्रपट हिट होतो तेव्हा कलाकार बरोबर त्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाची सुद्धा प्रशंसा केली जाते .आपण नेहमीच कलाकारांच्या खाजगी आयुष्यात काय चाललंय त्यांच्या पत्नी काय करतात याबाबत जाणून घेण्यास नेहमीच उत्सुक असतो. पण खूप कमी लोकांना दिग्दर्शकांच्या कुटुंबीयांबद्दल त्यांच्या पत्नीविषयी माहिती आहे. बॉक्स ऑफिस कोटींचा गल्ला जमावणाऱ्या दिग्दर्शकांच्या पत्नी ही आपल्या क्षेत्रात माहिर आहेत. या लेखात जाणून घेऊन कोणाची पत्नी काय काम करतात त्या.  


रोहित शेट्टी 
सिंघम आणि गोलमाल सिरिस सारखे हिट चित्रपट देणाऱ्या रोहित शेट्टीने एका मराठमोळ्या मुलीशी लग्न केले आहे. रोहितची पत्नी माया मोरे एक बँकर असून ती लाईम लाईट पासून नेहमीच दूर राहते. 



राजकुमार हिरानी
राजकुमार हिरानी याचे अरेंज मॅरेज झाले आहे. मंजित लांबा हिच्याशी त्याचा विवाह झाला आहे. मंजित  एक पायलट म्हणून कार्यरत आहे. राजकुमार हिरानीच्या नावावर '3 इडियटस', 'पी.के' सारखे ब्लॉकबास्टर चित्रपट आहेत.



राकेश ओम प्रकाश मेहरा
रंग दे बसंती, भाग मिल्खा भागसारख्या बॉलिवूडला राकेश ओम प्रकाश मेहरा यांनी अनेक चित्रपट दिले आहेत. मेहरा यांच्या पत्नी पी. एस. भारती या स्वत: फिल्म एडिटर आहेत. प्रकाश झोतापासून कायम त्या दूर राहतात. 



आशुतोष गोवारीकर
लगान आणि स्वदेश सारखी आउट ऑफ द बॉक्स चित्रपट तयार करणारे आशुतोष गोवारीकर यांची पत्नी सुनीता या एअर होस्टेस आहेत. 



अनुराग बासू
'लाईफ इन मेट्रो' आणि 'बर्फी' सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केलेल्या अनुराग बासूने अॅडव्हर्टिंग मीडियामध्ये असलेल्या तानीशी लग्न केले आहे. तानी ही अनुराग बासूची आधी बॉस होती. 

 

Web Title: The director's wife is going to do this work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.