प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, विद्या बालनला दिलेला पहिला ब्रेक, सिनेसृष्टीवर पसरली शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2023 12:57 PM2023-11-04T12:57:11+5:302023-11-04T14:41:09+5:30

त्यांच्या निधनाच्या बातमीने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.

Director gautam haldar passes away due to cardiac arrest who give break vidya balan first movie | प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, विद्या बालनला दिलेला पहिला ब्रेक, सिनेसृष्टीवर पसरली शोककळा

प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, विद्या बालनला दिलेला पहिला ब्रेक, सिनेसृष्टीवर पसरली शोककळा

चित्रपट दिग्दर्शक गौतम हलदर यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे. ते 67 वर्षांचे होते. गौतम यांनी अनेक ब्लॉकबस्टर बंगाली चित्रपटांचे दिग्दर्शन केले. मीडिया रिपोर्टनुसार त्यांचं एका खाजगी रुग्णालयात निधन झाले. छातीत दुखत असल्याच्या तक्रारीनंतर त्यांना  रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गौतम यांनी रवींद्रनाथ टागोरांच्या रक्त कारबीसह 80 हून अधिक नाटकांचे दिग्दर्शन केले. 2003 मध्ये प्रदर्शित झालेला 'भलो थेको' हा दिग्दर्शक म्हणून त्यांचा पहिला बंगाली चित्रपट होता.

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनला पहिला ब्रेक गौतम हलदर यांनी दिला होता. गौतम यांच्या 'भलो थेको' या पहिल्या चित्रपटात विद्याने मुख्य भूमिका साकारली होती. याशिवाय 2019 मध्ये रिलीज झालेल्या 'निर्वाण' या चित्रपटातचे गौतम यांनी दिग्दर्शन केले होते. प्रेक्षकांनाही हा चित्रपट खूप आवडला होता. 'भलो थेको' मधील विद्या बालनचा अभिनय पाहून प्रदीप सरकार खूप प्रभावित झाले आणि त्यांनी तिला 'परिणीता' या बॉलिवूड चित्रपटात मुख्य भूमिका दिली. विद्याने आपल्या पहिल्याच चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवला आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री बनली.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी X (पूर्वीच्या ट्विटर) वर लिहिले, “प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक गौतम हलदर यांच्या निधनाने दु:ख झाले. त्यांच्या निधनाने संस्कृती जगताची मोठी हानी झाली आहे. ममता यांनी इंग्रजी आणि बंगाली भाषेत ट्विट केले होते.

Web Title: Director gautam haldar passes away due to cardiac arrest who give break vidya balan first movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.