​दिशा पटानी ने दिले असे खरमरीत उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2017 18:38 IST2017-02-24T13:08:47+5:302017-02-24T18:38:47+5:30

बॉलिवूडची अपकमिंग स्टार दिशा पटानी आपल्या बिनधास्त लूकसोबतच आपल्या बोल्ड व फॅशनेबल ड्रेसेससाठी ओळखली जाऊ लागली आहे. नुकत्याच झालेल्या ...

Direction Patani gave a clear answer | ​दिशा पटानी ने दिले असे खरमरीत उत्तर

​दिशा पटानी ने दिले असे खरमरीत उत्तर

लिवूडची अपकमिंग स्टार दिशा पटानी आपल्या बिनधास्त लूकसोबतच आपल्या बोल्ड व फॅशनेबल ड्रेसेससाठी ओळखली जाऊ लागली आहे. नुकत्याच झालेल्या फिल्मफेअर अवॉर्डमध्ये तिचा बोल्ड अंदाज अनेकांच्या नजरेत भरला. यातून दिशाला ‘जे मला चांगले वाटते तेच मी घालते’ असे सांगयचे असेल, मात्र तिच्या या बोल्ड लूकमुळे सोशल मीडियावर एका युजरने केलेल्या कमेंटचा दिशाने चांगलाच समाचार घेतला. 

सोशल मीडियावरून दिशाच्या नावाने क मेंट करणाºया व्यक्तीने फिल्मफेअर अवॉडर्सचे टेलीकास्ट पाहिले, त्यात दीशाचा बोल्ड अंदाज पाहिल्यावर तो भडकला. त्याने दिशाच्या एका फोटोवर कमेंट करीत आपत्तीजनक शब्द वापरले. त्याने तू इम्प्लाँट सर्जरी केली असल्याचे आम्हाला दाखवू नकोस अशी कमेंट केली. यानतंर दिशावर करण्यात आलेली क मेंट ब्लॉक करण्यात आली आहे. 



या कंमेटवर दिशाने असे उत्तर दिले की, तो यानंतर कधीच अशी चूक करणार नाही. दिशाने एक पोस्ट शेअर करून लिहले, ‘‘मी बरेच दिवसांपासून रेप आणि छेडखानीच्या बातम्या वाचत आहे. आपल्या देशात महिलांना देवींप्रमाणे पूजनीय मानले जाते. मात्र ही आपल्यासाठी शरमेची गोष्ट आहे की, काही लोकांमध्ये ही गोष्ट जाणूण घेण्याची समजदारी देखील नाही, एक मानव आणि जनावरांमधील अंतर ते पार करीत आहेत. महिलांच्या कपड्यावरून त्यांच्याबद्दल निर्णय घेणे सोपे आहे, मात्र आपली निच विचार स्वीकार करणे त्यांच्यासाठी कठीण आहे’’. आपल्या लांबलचक पोस्टमध्ये दिशाने महिला व मुलींना स्वत:साठी उभे होण्याचे आवाहन केले. 

दिशाच्या चित्रपट करिअरचा विचार केल्यास नुकताच तिची महत्त्वाची भूमिका असलेला आंतराष्ट्रीय चित्रपट ‘कुंग फू योगा’ रिलीज झाला आहे. दिशा काही मोठ्या ब्रँडचे अ‍ँडोर्समेंट देखील करीत आहे. दिशा चित्रपटांमुळे फारशी चर्चेत आली नसली तरी आपल्या खासगी आयुष्यामुळे तिने चांगलचि प्रसिद्धी मिळविली आहे. 

Really felt a need to share this!

Web Title: Direction Patani gave a clear answer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.