कंगनाशी पंगा घेणार गायक दिलजीत दोसांझ एका गाण्यासाठी घेतो इतकी मोठी रक्कम, संपत्तीचा आकडा वाचून व्हाल थक्क

By गीतांजली | Updated: December 4, 2020 19:00 IST2020-12-04T19:00:00+5:302020-12-04T19:00:02+5:30

गायक - अभिनेता दिलजीत दोसांझने कंगनासोबत पंगा घेतल्यानंतर चर्चेत आला आहे.

Diljit dosanjh fees for a song and bollywood film | कंगनाशी पंगा घेणार गायक दिलजीत दोसांझ एका गाण्यासाठी घेतो इतकी मोठी रक्कम, संपत्तीचा आकडा वाचून व्हाल थक्क

कंगनाशी पंगा घेणार गायक दिलजीत दोसांझ एका गाण्यासाठी घेतो इतकी मोठी रक्कम, संपत्तीचा आकडा वाचून व्हाल थक्क

अभिनेत्री कंगना रनौत शेतकरी आंदोलनातील एका वयोवृद्ध आजीची खिल्ली उडवल्याने अनेकांच्या निशाण्यावर आहे. गायक - अभिनेता दिलजीत दोसांझने कंगनावर पलटवार केला.  तिच्यात आणि गायक-अभिनेता दिलजीत दोसांझमध्ये ट्विटरवर वाद झाला. यानंतर दिलजीत दोसांझ चर्चेत आला. दिलजितच्या पंजाबी इंडस्ट्री आणि बॉलिवूडचा प्रवास खूप इंटरेस्टिंग आहे. अभिनयात येण्यापूर्वी त्यांने गायक म्हणून कारकिर्दीची सुरूवात केली, गेल्या काही वर्षांत त्याला मोठे यश मिळाले. पण तो एका गाण्यासाठी आणि सिनेमासाठी किती पैसे घेते हे आपल्याला माहिती आहे का?

दिलजितने 'पटियाला पेग', '5 तारा', 'डू यू नो'  आणि 'लिंबरगिनी अशी अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. याशिवाय त्याने सरदारजी सारीज, जट अँड ज्युलियट सीरिज, 'अंबरसरिया' आणि 'शादा' सारख्या सुपरहिट सिनेमे दिले आहेत. 2010 मध्ये दिलजित दोसांझ फोर्ब्स 100 सेलिब्रिटीमध्ये 39 व्या क्रमांकावर होता. त्याची कमाई 36.91 कोटी रुपये होती. त्याची एकूण संपत्ती 115 कोटी रुपये आहे.


एका गाण्यासाठी 8 लाख रुपये
उडता पंजाबच्या यशानंतर दिलजित दोसांझने आपली फी 4 कोटी केली. याशिवाय इंडियाज राइझिंग स्टारचा जज होण्यासाठी विकेंडच्या एपिसोडसाठी  36 लाख 10 हजार रुपये घेतले. एका युट्यूब वाहिनीच्या रिपोर्टनुसार, दिलजीत दोसांझ एका गाण्यासाठी आठ लाख रुपये घेतो. गाण्यासाठीचे हे मानधन 2018 मध्ये होते

Web Title: Diljit dosanjh fees for a song and bollywood film