Diljit Dosanjh B’day Special: पंजाबी अल्बममधून करिअरची सुरुवात करणाऱ्या दिलजीतच्या संपत्तीचा आकडा वाचून व्हाल अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2021 13:20 IST2021-01-06T13:09:36+5:302021-01-06T13:20:04+5:30
दिलजीत दोसांज आज त्याच्या वाढदिवस साजरा करतो आहे.

Diljit Dosanjh B’day Special: पंजाबी अल्बममधून करिअरची सुरुवात करणाऱ्या दिलजीतच्या संपत्तीचा आकडा वाचून व्हाल अवाक्
शेतकरी आंदोलना दरम्यान कंगनाशी पंगा घेतल्यानंतर दिलजीत दोसांझ अचानक चर्चेत आला. आज ६ जानेवारीला दिलजीत दोसांज त्याच्या वाढदिवस साजरा करत आहे. दिलजीतचा पंजाबी इंडस्ट्री ते बॉलिवूडचा प्रवास खूप इंटरेस्टिंग आहे. अभिनयात येण्यापूर्वी त्यांने गायक म्हणून कारकिर्दीची सुरूवात केली, गेल्या काही वर्षांत त्याला मोठे यश मिळाले. पण तो एका गाण्यासाठी आणि सिनेमासाठी किती पैसे घेते हे आपल्याला माहिती आहे का?
दिलजीतचा पहिला अल्बम होता 'Ishq Da Uda Ada'. हा २००४ मध्ये रिलीज झाला होता. त्यानंतर त्याचा दुसरा अल्बम आला. तिसऱ्या अल्बमनंतर दिलजीत अधिक पॉप्युलर झाला. त्याने त्याचा द नेक्स्ट लेव्हल अल्बम हनी सिंहसोबत केला होता. त्यातील पूर्ण ९ गाणी पॉप्युलर झाली होती. दिलजितने 'पटियाला पेग', '5 तारा', 'डू यू नो' आणि 'लिंबरगिनी अशी अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. याशिवाय त्याने सरदारजी सारीज, जट अँड ज्युलियट सीरिज, 'अंबरसरिया' आणि 'शादा' सारख्या सुपरहिट सिनेमे दिले आहेत. 2010 मध्ये दिलजित दोसांझ फोर्ब्स 100 सेलिब्रिटीमध्ये 39 व्या क्रमांकावर होता. त्याची कमाई 36.91 कोटी रुपये होती. त्याची एकूण संपत्ती 115 कोटी रुपये आहे.
एका गाण्यासाठी 8 लाख रुपये उडता पंजाबच्या यशानंतर दिलजित दोसांझने आपली फी 4 कोटी केली. याशिवाय इंडियाज राइझिंग स्टारचा जज होण्यासाठी विकेंडच्या एपिसोडसाठी 36 लाख 10 हजार रुपये घेतले. एका युट्यूब वाहिनीच्या रिपोर्टनुसार, दिलजीत दोसांझ एका गाण्यासाठी आठ लाख रुपये घेतो. गाण्यासाठीचे हे मानधन 2018 मध्ये होते.