दिलीप कुमार यांना 'या' आजाराची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 15:33 IST2018-09-06T15:31:20+5:302018-09-06T15:33:24+5:30

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे मित्र फैजल फारूख यांनी दिलीप कुमार यांच्या ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे.

Dilip kumar Diagnosed With Pneumonia | दिलीप कुमार यांना 'या' आजाराची लागण

दिलीप कुमार यांना 'या' आजाराची लागण

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले  होते. डॉक्टरांनी त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्याचं सांगितलं होते. मिळालेल्या मीडिया रिपोर्टनुसार, दिलीप कुमार यांना न्युमोनिया  झाला असल्याची माहिती मिळत आहे. सध्या त्यांच्यावर लिलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दिलीप कुमार यांचे मित्र फैजल फारूख यांनी दिलीप कुमार यांच्या ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे. अल्लाहच्या कृपेनं बाकी सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. त्यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होतेय. त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना आणि दुवा करा,’ असं ट्विट दिलीप कुमार यांच्या ट्विटर अकाउंटवरून करण्यात आले आहे. 


ट्रेजेडी किंग म्हणून ओळखले जाणारे दिलीपकुमार १९९८ मध्ये आलेल्या ‘किला’ या चित्रपटात अखेरचे अभिनय करताना दिसले.  त्यांनी १९४४ मध्ये आपल्या अभिनयाला सुरुवात केली. ‘ज्वार भाटा’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता. तब्बल सहा दशक त्यांनी बॉलिवूडवर निर्विवाद वर्चस्व गाजविले. आपल्या विशिष्ट अभिनय शैलीने त्यांनी प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले होते. इंडस्ट्रीमध्ये  त्यांनी एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले. आतापर्यंत त्यांना आठ वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेता या श्रेणीत फिल्मफेअर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. त्याव्यतिरिक्त त्यांना भारतीय चित्रपट सुष्टीचा सर्वोत्कृष्ट दादासाहेब फाळके या पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे.

Web Title: Dilip kumar Diagnosed With Pneumonia