मल्याळम अभिनेत्रीच्या अपहरणप्रकरणी अभिनेता दिलीपला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2017 10:55 IST2017-07-11T05:25:08+5:302017-07-11T10:55:08+5:30
प्रसिद्ध मल्याळम अभिनेत्रीचे अपहरण करुन लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अभिनेता दिलीप याला पोलिसांनी सोमवारी अटक केली. दिलीप या प्रकरणात गुंतलेला ...

मल्याळम अभिनेत्रीच्या अपहरणप्रकरणी अभिनेता दिलीपला अटक
प रसिद्ध मल्याळम अभिनेत्रीचे अपहरण करुन लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अभिनेता दिलीप याला पोलिसांनी सोमवारी अटक केली. दिलीप या प्रकरणात गुंतलेला असल्याचे ठोस पुरावे आढळल्यानंतर, पोलिसांनी दिलीपला अटक केली. गेल्या आठवड्यात दिलीप आणि सिनेदिग्दर्शक नादिर शहा यांची जवळपास १३ तास चौकशी करण्यात आली होती. यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा कट रचल्याबद्दल दिलीपला अटक करण्यात आली.
दिलीपने अभिनेत्रीच्या अपहरणासाठी पुल्सर सुनी नामक इसमाला पैसे दिले होते. पुल्सरने पोलिसांना दिलेल्या बयानानुसार, त्याने दिलीपला यासंदर्भात एक पत्रही लिहिले होत. अर्थात दिलीपने पुल्सरला ओळण्यास नकार दिला आहे. मात्र दोघांच्या एकत्र सेल्फीने या प्रकरणाचे बिंग फुटले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीपचे संबंधित अभिनेत्रीसोबत वैर होते. तिचा बदला घेण्यासाठी त्याने हा सगळा कट रचला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण घटनेची तयारी वर्षभरापूर्वी करण्यात आली होती आणि हे दुसºयांदा घडत होते. १९ फेब्रुवारीला कोचीजवळ एका लोकप्रीय अभिनेत्रीवर हल्ला करण्यात करत तिचे अपहरण करण्यात आले होते. अपहरणाच्या दोन तासानंतर तिला दिग्दर्शक व अभिनेता लाल यांच्या घराबाहेर फेकून देण्यात आले होते. लाल यांनी यासंदर्भात पोलिसांना सूचित केले होते. यासंदर्भात पोलिसांनी एप्रिलमध्ये सुपारी गँगच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले होते. गत महिन्यात या गँगमधील सुनील कुमार उर्फ पुल्सर सुनी याने लिहिलेले एक पत्र समोर आले होते. या पत्रात सुनीने दिलीपकडे पैशांची मदत मागितली होती. दरम्यान, दिलीपने पोलिसांकडे सुनील त्याला ब्लॅकमेल करत असल्याची तक्रार नोंदवली होती.