DIE HARD FAN : ... अन् शिल्पा शेट्टी पडली जॅकी चॅनच्या पाया !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2017 18:44 IST2017-01-24T13:12:04+5:302017-01-24T18:44:03+5:30

गेल्या सोमवारी भारतात आलेल्या अ‍ॅक्शन आणि कुंगफू स्टार जॅकी चॅनचे बॉलिवूड कलाकारांनी जोश आणि जल्लोषात स्वागत केले. एकीकडे भारतात ...

DIE HARD FAN: ... and Shilpa Shetty falls on Jackie Chan's foundation! | DIE HARD FAN : ... अन् शिल्पा शेट्टी पडली जॅकी चॅनच्या पाया !

DIE HARD FAN : ... अन् शिल्पा शेट्टी पडली जॅकी चॅनच्या पाया !

ल्या सोमवारी भारतात आलेल्या अ‍ॅक्शन आणि कुंगफू स्टार जॅकी चॅनचे बॉलिवूड कलाकारांनी जोश आणि जल्लोषात स्वागत केले. एकीकडे भारतात आगमन होताच, हॉटेलमध्ये जाऊन बॉलिवूडचा दबंग सलमान खान याने त्याची भेट घेतली, तर दुसरीकडे शिल्पा शेट्टी हिने चक्क जॅकीच्या पाया पडून ती त्याची किती मोठी फॅन आहे हे दाखवून दिले. एवढेच नाही तर तिने जॅकीविषयी गौरवोद्गार काढताना म्हटले की, मी जॅकीला भेटण्यासाठी एक अ‍ॅक्टर किंवा योगाविषयी आकर्षण असल्याने आली नसून, त्याच्या फॅनच्या नात्याने आली आहे. शिल्पाचे जॅकी चॅनविषयीचे आकर्षण तिने सोशल मीडियावरही व्यक्त करून जॅकीची ‘डाई हार्ड फॅन’ असल्याचे दाखवून दिले. 

यावेळी शिल्पा म्हणाली की, जॅकी चॅन यांचे ५६ वर्षांचे करिअर केवळ अ‍ॅक्शन फिल्मसाठी राहिले आहे. त्यामुळे मी जाहीरपणे सांगू इच्छिते की, तो जगातील सर्वात मोठा अ‍ॅक्शन हिरो आहे. यावेळी शिल्पा जॅकीच्या सन्मानार्थ त्याच्या पायाही पडली. पुढे बोलताना शिल्पा म्हणाली की, जर तुम्ही मनापासून एखाद्या गोष्टीचा विचार करीत असाल तर ती तुम्हाला नक्कीच मिळते. मला माझ्या आयुष्यात फिल्म स्टारप्रती कधीच आकर्षण राहिले नाही; मात्र जॅकी चॅन त्यास अपवाद आहे. मी त्याचा मनापासून सन्मान करतेय. मी फक्त जॅकी चॅनला बघूनच कराटे शिकले आहे. 



शिल्पाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला असून, ज्यामध्ये ती जॅकी चॅनसोबत खूपच उत्साहित दिसत आहे. जॅकीने शिल्पाला एक गिफ्टही दिल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. शिल्पा नेहमीच योगा तसेच कराट्यांविषयी आकर्षित राहिली आहे. बºयाचशा ठिकाणी ती योगाचे प्रशिक्षण देण्यासाठीदेखील गेली आहे. 
 

Web Title: DIE HARD FAN: ... and Shilpa Shetty falls on Jackie Chan's foundation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.