राधे माँच्या लेकाला पाहिलंत का?, दिसायला आहे खूप हॅण्डसम, सिनेइंडस्ट्रीत केलं पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2023 11:38 AM2023-05-18T11:38:28+5:302023-05-18T11:38:46+5:30

Radhe Maa : राधे माँला कोणत्याही परिचयाची गरज नाही. मात्र तुम्ही त्यांच्या मुलाला पाहिलं आहे का? ज्याने नुकतेच अभिनयात पदार्पण केले आहे.

Did you see Radhe Maa's Son?, looking very handsome, made her debut in the cine industry | राधे माँच्या लेकाला पाहिलंत का?, दिसायला आहे खूप हॅण्डसम, सिनेइंडस्ट्रीत केलं पदार्पण

राधे माँच्या लेकाला पाहिलंत का?, दिसायला आहे खूप हॅण्डसम, सिनेइंडस्ट्रीत केलं पदार्पण

googlenewsNext

राधे माँ(Radhe Maa)ला कोणत्याही परिचयाची गरज नाही. मात्र तुम्ही त्यांच्या मुलाला पाहिलं आहे का? नाही ना. त्यांच्या मुलाचे नाव हरजिंदर सिंग (Harjinder Singh) असून त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. तो इंस्पेक्टर अविनाश या वेबसीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे. या वेबसीरिजमध्ये अभिनेता रणदीप हुड्डा मुख्य भूमिकेत आहे. तो या सीरिजमध्ये एसटीएफ अधिकाऱ्याच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. 

हरजिंदर सिंग म्हणाला की, इंस्पेक्टर अविनाश हा खूपच इंटरेस्टिंग प्रोजेक्ट आहे आणि ही खूप मोठी सीरिज आहे. ही चांगली बाब आहे की अभिनेत्याकडे प्रेक्षकांसोबत वेळ व्यतित करण्यासाठी वेळ आहे. एक पात्र प्रत्येक एपिसोडसोबत चांगला होत जातो. मी तरुण आणि प्रामाणिक एसटीएफ अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. ज्याला युपीतील वाढत्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी दाखल करण्यात आले आहे. तो आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी आणि विभागात आपली छाप उमटवण्यासाठी प्रयत्न करतो आहे.

अभिनयात अपयशी झाला तर...
करिअरमध्ये हरजिंदरला वेगवेगळ्या भूमिका करायच्या आहेत. याबाबत तो सांगतो की, मी फक्त एक सेलिब्रेटी म्हणून नाही तर कलाकार म्हणून प्रगती करु इच्छितो. मी एका बिझनेस फॅमिलीशी संबधीत आहे. माझ्या कुटुंबाने मला स्वप्न साकार करणे शिकवले आहे. जर अभिनयात अपयशी झालो तर फॅमिली बिझनेस जॉईन करेन.

Web Title: Did you see Radhe Maa's Son?, looking very handsome, made her debut in the cine industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.