​नागा चैतन्य व समांथा रूथच्या कॅथलिक वेडिंगचे हे फोटो तुम्ही पाहिलेत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2017 15:30 IST2017-10-08T09:58:28+5:302017-10-08T15:30:03+5:30

साऊथ स्टार अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री समांथा रुथने यांच्या पारंपरिक वैदिक पद्धतीने केलेल्या लग्नाचे फोटो आपण बघितले. आता ...

Did you see this photo of the Catholic Wedding of Naga Chaitanya and Samantha Ruth? | ​नागा चैतन्य व समांथा रूथच्या कॅथलिक वेडिंगचे हे फोटो तुम्ही पाहिलेत?

​नागा चैतन्य व समांथा रूथच्या कॅथलिक वेडिंगचे हे फोटो तुम्ही पाहिलेत?

ऊथ स्टार अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री समांथा रुथने यांच्या पारंपरिक वैदिक पद्धतीने केलेल्या लग्नाचे फोटो आपण बघितले. आता आम्ही तुमच्यासाठी या दोघांच्या कॅथलिक लग्नाचे फोटो घेऊन आलो आहोत. ६ आॅक्टोबर रोजी दोघांनी गोवा येथील डब्ल्यू हॉटेलमध्ये हिंदू रितीरिवाजाने लग्न केले होते. यानंतर दुस-या दिवश्ी म्हणजे ७ आॅक्टोबरला नागा चैतन्य व समांथा या दोघांनी कॅथलिक रितीरिवाजानुसार लग्न केले. यावेळी समांथाने डिझायनर क्रेशा बजाजचा पर्पल रंगाचा ड्रेस घातला होता. तिच्या गळ्यातील डायमंड नेकलेस आणि मॅचिंग इअररिंग्स सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होता. नागाने काळ्या रंगाचा टक्सीडो सूट घातला होता. 





नागा चैतन्यचे वडील नागार्जुनने चर्चमध्ये केलेल्या या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.हिंदू रितीरिवाजाप्रमाणे झालेल्या लग्नात समांथाने  नागाच्या आजीने दिलेली साडी घातली होती. या साडीला डिझायनर क्रेशा बजाजने मॉर्डन टच दिला होता.





 या लग्नाचे अनेक फोटो सध्या व्हायरल होत आहे. याशिवाय लग्नाचा एक व्हिडिओही व्हायरल होतो आहे. लग्नानंतर रात्री रंगलेल्या पार्टीचा हा व्हिडिओ आहे. या पार्टीत नागार्जुन धम्माल डान्स करताना दिसत आहेत. 



  नागा आणि समांथाच्या लग्नाचे रिसेप्शन हैदराबाद येथे होणार आहे. यावेळी समांथा क्रेशा बजाजने डिझाईन केलेला लहंगा घालणार आहे. रिसेप्शननंतर लगेच दोघेही कामावर परतणार आहे. आपआपले काम संपवल्यानंतर समांथा आणि नागा ४० दिवसाच्या हनीमुनसाठी जाणार आहेत.  दोघेही हनीमुनसाठी न्युयॉर्कला जाणार आहेत आणि नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात भारतात परतणार आहेत.
‘ये माया चेस्वे’च्या सेटवर नागा चैतन्य व  समांथा यांची पहिली भेट झाली होती आणि या पहिल्याच भेटीत ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते. २००९ मध्ये आलेला ‘ये माया चेस्वे’ हा  समांथाचा पहिला चित्रपट होता. समांथाने सप्टेंबर २०१६ मध्ये नागासोबत असलेल्या तिच्या रिलेशनशिपचंी जाहीरपणे वाच्यता केली होती. वास्तविक हे जोडपं गेल्या आठ वर्षांपासून एकमेकांना डेट करीत आहे. 

ALSO READ : प्रेयसी  समांथा रूथसोबत लग्नाच्या पवित्र बंधनात अडकला नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य

Web Title: Did you see this photo of the Catholic Wedding of Naga Chaitanya and Samantha Ruth?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.