‘धाकड’चे आमिर खान वर्जन तुम्ही पाहिलेय का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2016 16:46 IST2016-12-19T11:46:48+5:302016-12-21T16:46:20+5:30
dangal heard raftaars dhaakad now watch aamir khans version : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट सुपरस्टार आमिर खान याचा ‘दंगल’ सिनेमा सध्या सर्वाधिक चर्चेत आहे. चित्रपट प्रदर्शित व्हायला उणेपुरे काही दिवस उरले असताना आमिरने चित्रपटाची जबरदस्त पब्लिसिटी चालवली आहे. याच पब्लिसिटीचा एक भाग म्हणजे, आमिरने स्वत: गायलेले ‘धाकड’ हे गाणे. आमिरच्या आवाजातील या गाण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

‘धाकड’चे आमिर खान वर्जन तुम्ही पाहिलेय का?
ब लिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट सुपरस्टार आमिर खान याचा ‘दंगल’ सिनेमा सध्या सर्वाधिक चर्चेत आहे. चित्रपट प्रदर्शित व्हायला उणेपुरे काही दिवस उरले असताना आमिरने चित्रपटाची जबरदस्त पब्लिसिटी चालवली आहे. याच पब्लिसिटीचा एक भाग म्हणजे, आमिरने स्वत: गायलेले ‘धाकड’ हे गाणे. आमिरच्या आवाजातील या गाण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
कुठल्याही रिअॅलिटी शोमध्ये न जाता आमिरने काहीशा आगळ्या-वेगळ्या पद्धतीने ‘दंगल’ची पब्लिसिटी करण्याचा निर्णय घेतलाय. सध्या आमिर यात कमालीचा बिझी आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर सध्या ‘दंगल’ची गाणी, बिहाइन्ड दी सीन्स, आमिरचा फॅट टू फिट व्हिडिओ, गीता-बबीताची भूमिका साकारणाºया मुलींनी आपआपले पात्र साकारण्यासाठी घेतलेली मेहनत अशा सगळ्या व्हिडिओची धूम आहे. त्यातच आमिरच्या आवाजातील ‘धाकड’ गाण्याच्या व्हिडिओची भर पडली आहे.
१८ वर्षांपूर्वी आमिरने‘गुलाम’ चित्रपटात ‘ऐ क्या बोलती तू’ हे गाणे गायले होते. याशिवाय ‘सरफरोश’मधील ‘इस दिवाने लडके को’ या गाण्यासही त्याने आवाज दिला होता. याशिवाय ‘फना’ चित्रपटातील ‘चंदा चमके’ या गाण्यातील काही ओळी आमिरने गायल्या होत्या. मात्र ‘धाकड’ या प्रमोशनल गाण्यात आमिर पहिल्यांदा रॅप करताना दिसणार आहे. यातील त्याचा लूकही फुल टू रॅपर असा आहे.
मुलीही मुलांप्रमाणेच कुस्ती खेळू शकतात आणि अनेकदा त्यांच्यापेक्षा वरचढही ठरु शकतात हे ‘धाकड’ गाण्यातून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आमिरच्या आॅनस्क्रिन मुली पुरुष मल्लांना कुस्तीच्या आखाड्या चीत करताना या गाण्यात दिसतात. आता आमिरच्या प्रमोशनल गाण्यात काय दिसते, ते बघूयात...