Wow! मेकअपविनाही खुलले सौंदर्य, तुम्ही तिला ओळखले का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 13:30 IST2020-03-24T13:04:30+5:302020-03-24T13:30:10+5:30

. 'आशिकी 2', 'एक व्हिलन', 'एबीसीडी 2', 'बागी', 'रॉक ऑन 2' 'स्त्री' अशा तिच्या विविध सिनेमातील भूमिका रसिकांना भावल्या आहेत.

Did You Saw Shraddha kapoor Joshi This Pic, Without makeup looking gorgeous-SRJ | Wow! मेकअपविनाही खुलले सौंदर्य, तुम्ही तिला ओळखले का?

Wow! मेकअपविनाही खुलले सौंदर्य, तुम्ही तिला ओळखले का?

आपल्या अभिनयाने श्रद्धा कपूरने रसिकांची मनं जिंकली आहेत. सोशल मीडियावरही ती बरीच सक्रिय आहे. सोशल मीडियावर ती आपले फोटो आणि घरात बसून ती सध्या कसा वेळ घालवत आहे. या गोष्टी चाहत्यांसह शेअर करत असते. नुकताच श्रद्धाचा तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केलेला आहे. हा सेल्फी पाहून तिच्या सौंदर्यांची तारिफ सध्या तिचे चाहते करत आहेत. नेहमी मेकअपमध्ये फिरत असलेले सेलिब्रेटी सध्या कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहे. तसेच ती तिच्या क्वॉरंटाईनमुळे क्वॉलिटी टाईम एन्जॉय करत असल्याचे पाहायला मिळत आहे.श्रद्धा कपूरला मेकअपशिवाय पाहिलं तरी ती रिअल ब्यूटी आहे असेच तुम्ही म्हणाल.

शक्ती कपूरच्या पावलावर पाऊल ठेवून त्याची मुलगी श्रद्धा कपूरने देखील काही वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. श्रद्धा कपूरने खूपच कमी वेळात एक अभिनेत्री, गायिका, गीतकार आणि डिझायनर म्हणून स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. 'आशिकी 2', 'एक व्हिलन', 'एबीसीडी 2', 'बागी', 'रॉक ऑन 2' 'स्त्री' अशा तिच्या विविध सिनेमातील भूमिका रसिकांना भावल्या आहेत. आजच्या पिढीची नायिका म्हणून श्रद्धाने तरुणाईच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. तिच्या काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या बागी ३ या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे.

श्रद्धा कपूरने दहा वर्षांपूर्वी तीन पत्ती या चित्रपटाद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. श्रद्धा केवळ १६ वर्षांची असताना तिला एका चित्रपटात काम करण्याची ऑफर मिळाली होती. लकी या चित्रपटातील भूमिकेविषयी विचारण्यात आले होते. पण त्यावेळी खूपच लहान होते. लहानपणापासूनच चित्रपटात काम करायचे होते आणि त्यातही सलमान खानसोबत चित्रपट करण्याची संधी मिळणार होती. पण तरीही मी अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करण्याचे तिने ठरवले. योग्य वेळ आल्यावरच तिने करिअर म्हणून चित्रपटात काम करण्यास सुरूवात केली.

Web Title: Did You Saw Shraddha kapoor Joshi This Pic, Without makeup looking gorgeous-SRJ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.