​‘ट्युबलाईट’च्या ट्रेलरमधील ‘या’ गोष्टींकडे तुम्ही लक्ष दिले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2017 12:27 IST2017-05-26T06:57:57+5:302017-05-26T12:27:57+5:30

सलमान खानच्या ‘ट्युबलाईट’चे ट्रेलर अखेर काल रिलीज झाले. या ट्रेलरने कुठल्या चित्रपटाची आठवण करून दिली असेल तर ती सलमानच्याच ...

Did you pay attention to these 'things' in 'TubLight' trailer? | ​‘ट्युबलाईट’च्या ट्रेलरमधील ‘या’ गोष्टींकडे तुम्ही लक्ष दिले?

​‘ट्युबलाईट’च्या ट्रेलरमधील ‘या’ गोष्टींकडे तुम्ही लक्ष दिले?

मान खानच्या ‘ट्युबलाईट’चे ट्रेलर अखेर काल रिलीज झाले. या ट्रेलरने कुठल्या चित्रपटाची आठवण करून दिली असेल तर ती सलमानच्याच ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटाची. आता सलमानसाठी ही चांगली गोष्ट आहे वा नाही, ठाऊक नाही. पण ट्रेलरमधील संपूर्ण फील एकदम ‘बजरंगी भाईजान’सारखा आहे. सलमानचा तोच भोळा चेहरा, चेहºयावरचे तेच निष्पाप भाव, मुलांसोबतची केमिस्ट्री सगळे काही सेम...सेम...!



‘बजरंगी भाईजान’मध्ये सलमान पाकिस्तानात जात असतो तर या चित्रपटात चीनमध्ये. पहिल्या चित्रपटात तो मुन्नीचे घर शोधतो तर या ‘ट्युबलाईट’मध्ये आपला भाऊ. ‘बजरंगी भाईजान’मध्ये सलमान करिनासोडून कुणावरच विश्वास नव्हता. या चित्रपटातही सलमानला केवळ आणि केवळ त्याच्या भावावर विश्वास आहे. त्याच्यासाठी तो काहीही करू शकतो, असे दाखवले गेले आहे.



‘बजरंगी भाईजान’मध्ये सलमानच्या प्रवासातला सोबती बनला होता, नवाजुद्दीन सिद्दीकी. ‘ट्युबलाईट’मध्ये त्याचा सोबती बनलायं मार्टिन रे टंगू. सहा वर्षांचा चिमुकला. सलमानच्या कॉस्च्युमनेही ‘बजरंगी भाईजान’ व ‘ट्युबलाईट’मधील साम्य आणखीच अधोरेखीत केले आहे. आता केवळ यापेक्षा अधिक साम्य असायला नको, म्हणजे मिळवले.



दिग्दर्शक कबीर खान यांनी ‘ट्युबलाईट’मध्ये माधुरी दीक्षित व सलमानवर चित्रीत एका दृश्याचीही कॉपी केली आहे. ‘हम आपके है मधील’सलमान व माधुरीचा गुलेल सीन ‘ट्युबलाईट’मध्येही आपल्याला दिसणार आहे. फरक केवळ एवढाच की यात, माधुरीच्या जागी मार्टीन हा चिमुकला असणार आहे.
एकंदर काय, तर ‘ट्युबलाईट’ या चित्रपटाचा ट्रेलर पदोपदी सलमानच्या ‘बजरंगी भाईजान’ची आठवण करून देत आहे. अर्थात कबीर खानचा याहीमागे काही उद्देश असावा. आता हा उद्देश काय, हे कळण्यासाठी आपल्याला ‘ट्युबलाईट’च्या रिलीजचीच प्रतीक्षा करावी लागणार आहे.


Web Title: Did you pay attention to these 'things' in 'TubLight' trailer?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.