तुम्हाला माहीत आहे का, अली अब्बास जाफरची पत्नी झळकली आहे भारत चित्रपटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 11:48 IST2021-01-08T11:46:45+5:302021-01-08T11:48:05+5:30

अलीच्या पत्नीने भारत या चित्रपटात काम केले आहे. अलीनेच एका मुलाखतीत याविषयी सांगितले आहे.

Did you know Ali Abbas Zafar's wife shook a leg with Disha Patani in a song from Bharat? | तुम्हाला माहीत आहे का, अली अब्बास जाफरची पत्नी झळकली आहे भारत चित्रपटात

तुम्हाला माहीत आहे का, अली अब्बास जाफरची पत्नी झळकली आहे भारत चित्रपटात

ठळक मुद्देभारत या चित्रपटात एका गाण्यात दिशा पटानीसोबत नृत्य करताना त्याची पत्नी दिसली होती.

अली अब्बास जाफरने सुलतान, गुंडे, टायगर जिंदा है, भारत यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्याचे नुकतेच लग्न झाले असून त्याची पत्नी एक फ्रेंच मॉडेल आहे. तुम्हाला माहीत आहे का, त्याच्या पत्नीने भारत या चित्रपटात काम केले आहे. भारत या चित्रपटात एका गाण्यात दिशा पटानीसोबत नृत्य करताना त्याची पत्नी दिसली होती. 

अली अब्बास जाफरच्या पत्नीचे नाव अलिशिया असून अलीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्याविषयी सांगितले आहे. अली सांगतो, आम्ही लग्न २०२२ मध्ये करण्याचे ठरवले होते. पण माझे आई-वडील व्यस्कर झाले आहेत. त्याच्यात त्यांना काही महिन्यापूर्वी कोरोना झाला होता. हे सगळे पाहाता आम्ही लवकर लग्न करण्याचे ठरवले. अलिशियासोबत माझी ओळख टायगर जिंदा है या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. ती लग्नाला जोपर्यंत होकार देत नाही, तोपर्यंच मी तिला सतत लग्नासाठी विचारतच होतो.

पुढे अली सांगतो, अलिशियाने भारत या चित्रपटात देखील काम केले आहे. एका गाण्यात ती दिशा पटानीसोबत थिरकली होती. 

अलीने २०२१ च्या सुरुवातीलाच लग्न करत त्याच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला. त्याने तिच्यासोबतचे फोटो शेअर करत आयुष्यभरासाठी माझी... असे कॅप्शन दिले होते. तुझ्याकडे पाहिल्यावर मी माझी दुःख, टेन्शन विसरून जातो असं देखील त्याने लिहिले होते. सामान्यांसोबत सेलिब्रेटींनीदेखील या दोघांना सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा दिल्या होत्या. 

अलीने एक लेखक, निर्माता, दिग्दर्शक म्हणून बॉलिवूडमध्ये ओळख निर्माण केली आहे. त्याने दिग्दर्शित केलेला काली पीली हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात इशान खट्टर आणि अनन्या पांडे मुख्य भूमिकेत होते. तसेच त्याच्या तांडव या वेबसिरिजचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. यात सैफ अली खान, डिम्पल कपाडिया यांच्या मुख्य भूमिका असून हा ट्रेलर लोकांना प्रचंड आवडत आहे.

Web Title: Did you know Ali Abbas Zafar's wife shook a leg with Disha Patani in a song from Bharat?