अर्जुन रामपालच्या डॅडीमधले हे गाणे तुम्ही ऐकलात का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2017 15:37 IST2017-08-04T10:06:42+5:302017-08-04T15:37:05+5:30

अर्जुन रामपाल याचा आगामी चित्रपट डॅडी मधले आणखीन एक गाणं रिलीज करण्यात आले आहे. हे गाणं तु्म्हाला मिथुन चक्रवती यांची आठवण करुन देते.

Did you hear this song from Arjun Rampal's Daddy? | अर्जुन रामपालच्या डॅडीमधले हे गाणे तुम्ही ऐकलात का ?

अर्जुन रामपालच्या डॅडीमधले हे गाणे तुम्ही ऐकलात का ?

िनेता अर्जुन रामपाल याचा आगामी चित्रपट डॅडीतले नवे गाण रिलीज करण्यात आले आहे. या गाण्याचे बोल आहेत 'जिंदगी मेरी डांस डांस.' हे गाणे बघितल्यानंतर आपल्याला मिथुन चक्रवर्तीच्या डिस्को डान्सची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. मथुन चक्रवती अशा गाण्यांवर डान्स करायचे आणि त्याची चाल बांधून ते गायचे बप्पी लहरी. अर्जुनच्या या गाण्याचे शूटिंग दक्षिण मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये झाले आहे. गोल्डन रंगाच्या कपडे घालून दोन कलाकार स्टेजवर डान्स करताना दिसतायेत. भयानक चेहरा घेऊन अर्जुन रामपाल या हॉटेलमध्ये एंट्री घेतो. हॉटेलमध्ये गेल्यावर तो तिथल्या लोकांकडे रागाने पाहायला सुरुवात करतो. या गाण्यात तो पुल खेळताना दिसतो आहे. गाण्यातील दृश्य बघितल्यानंतर गाणं संपल्यावर तो कोणती तरी मोठी घटना निकालात काढणार असल्याचे कळतेय.



डॅडी या चित्रपटात अर्जुन रामपाल डॉन अरुण गवळीची भूमिका साकारत आहे. त्याच्या संपूर्ण प्रवास यात दाखवण्यात आला आहे. गुन्हेगारी विश्व ते राजकारण हा प्रवास यात उलगडण्यात येणार आहे. ‘डॅडी’ या चित्रपटाचे सहलेखक आणि दिग्दर्शन अशीम अहलुवालिया यांनी केले आहे. ७० च्या दशकात अरुण गवळी अंडरवर्ल्डच्या विळख्यात येतो आणि मग पुढे दगडी चाळीत तो गँग कशी तयार करतो. हे सगळे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. आधी 21 जुलैला हा चित्रपट रिलीज करण्यात येणार होता मात्रनंतर त्याची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. 

Web Title: Did you hear this song from Arjun Rampal's Daddy?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.