रिया चक्रवर्ती होती कोणत्या दबावाखाली? पोलिस चौकशी दरम्यान झाले उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 02:17 PM2020-06-20T14:17:01+5:302020-06-20T14:21:28+5:30

बॉलिवूडच्या सलमान खान, करण जोहर, एकता कपूरसह काही जणांवर त्याला आत्महत्येला भाग पाडल्याचे आरोप करण्यात आले

Did sushant singh rajput ask rhea chakraborty to cancel her contract with a known producer | रिया चक्रवर्ती होती कोणत्या दबावाखाली? पोलिस चौकशी दरम्यान झाले उघड

रिया चक्रवर्ती होती कोणत्या दबावाखाली? पोलिस चौकशी दरम्यान झाले उघड

googlenewsNext

अभिनेता सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केली. यानंतर बॉलिवूडच नव्हे तर देशभरात हळहळ व्यक्त करण्यात आली. बॉलिवूडच्या सलमान खान, करण जोहर, एकता कपूरसह काही जणांवर त्याला आत्महत्येला भाग पाडल्याचे आरोप करण्यात आले. सुशांत सिंग राजपूतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवतीचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे. मुंबई पोलिस या प्रकरणाचा तपास करित आहेत. 

बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार रिया चक्रवतीने खुलासा केला की, दोघांमध्ये झालेल्या भांडणानंतर सुशांत तिच्या एक मोठ्या टॅलेंट कंपनी आणि प्रोड्यूसरसोबतचा कॉन्ट्रेक्ट संपवण्यासाठी दबाव टाकत होता. रियाने मुंबई पोलिसांनी सांगितले की सुशांत सिंग राजपूत यांचे वांद्रे इथली घर हॉन्टेड आहे. रियाला असे वाटायचे सुशांतला सुद्धा असा वाटायचे. या गोष्टीला घेऊन तो टेन्शनमध्ये सुद्धा होता. सुशांत व मी लवकरच घर घेणार होतो आणि 2020 च्या अखेरपर्यंत लग्न करण्याचा आमचा विचार होता़, असे रियाने यावेळी पोलिसांना सांगितल्याचे कळते.

सुशांतच्या निधनाच्या काही दिवस आधी रियाने हे घर सोडले होते. सुशांतचे घर सोडण्यापूर्वी दोघांमध्ये मोठे भांडण झाले होते. या भांडणानंतरचे एकमेकांना केलेले मॅसेजही तिने पोलिसांना दाखवले. या भांडणानंतर दोघांमध्ये फोनवर बोलणे झाले होते, हेही तिने सांगितले. 
 

Web Title: Did sushant singh rajput ask rhea chakraborty to cancel her contract with a known producer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.