सासू-सुनेत बिनसलं? 'ॲनिमल'च्या सक्सेस पार्टीत नीतू कपूर यांनी आलियाला केलं इग्नोर? व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2024 11:18 AM2024-01-07T11:18:03+5:302024-01-07T11:18:28+5:30

'ॲनिमल'च्या सक्सेस पार्टीत रणवीरसह आलिया भट्ट, नीतू कपूर आणि महेश भटही सहभागी झाले होते. या पार्टीतील एक व्हिडिओ समोर आला आहे.

did nitu kapoor ignores alia bhat in animal success party video viral netizens react | सासू-सुनेत बिनसलं? 'ॲनिमल'च्या सक्सेस पार्टीत नीतू कपूर यांनी आलियाला केलं इग्नोर? व्हिडिओ व्हायरल

सासू-सुनेत बिनसलं? 'ॲनिमल'च्या सक्सेस पार्टीत नीतू कपूर यांनी आलियाला केलं इग्नोर? व्हिडिओ व्हायरल

२०२३च्या अखेरीस प्रदर्शित झालेल्या 'ॲनिमल' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. १ डिसेंबरला प्रदर्शित झालेला हा चित्रपट महिन्याभरानंतरही सिनेमागृहांत ठाण मांडून बसला आहे. संदीप वांगा रेड्डी दिग्दर्शित 'ॲनिमल' सिनेमाने केवळ देशातच नाही तर जगभरात डंका वाजवला आहे. 'ॲनिमल'च्या यशानंतर या सिनेमाची सक्सेस पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीसाठी रणबीरने त्याच्या कुटुंबासहित हजेरी लावली होती. 

'ॲनिमल'च्या सक्सेस पार्टीत रणवीरसह आलिया भट्ट, नीतू कपूर आणि महेश भटही सहभागी झाले होते. या पार्टीतील एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून आलिया आणि नीतू कपूर यांच्यामध्ये काहीतरी बिनसल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. आलियाने या पार्टीसाठी खास निळ्या रंगाचा डिझायनर ड्रेस परिधना केला होता. तर नीतू कपूर डेनिम लूक करून पार्टीत पोहोचल्या होत्या. 'ॲनिमल'च्या सक्सेस पार्टीत कपूर फॅमिलीने फोटोसाठी पोझही दिल्या. पण, यादरम्यान आलिया आणि नीतू कपूर यांनी नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.   

विरल भय्यानी या इन्स्टाग्राम पेजवरुन 'ॲनिमल' सक्सेस पार्टीतील एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत फोटो काढून झाल्यानंतर आलिया बाजूला जाऊन उभी राहिल्याचं दिसत आहे. त्यानंतर नीतू कपूर आलिया समोरूनच जातात. पण, त्या आलियाकडे पाहतही नाहीत. हा व्हिडिओ पाहून नीतू कपूर यांनी आलियाला इग्नोर केल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. यामुळे सासू-सुनेत बिनसल्याचंही काही नेटकरी म्हणत आहेत.

आलिया आणि रणबीरने २०२२ साली लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांतच आलिया-रणबीर आईबाबा झाले. त्यांना राहा ही मुलगी आहे. काही दिवसांपूर्वीच आलिया-रणबीरने त्यांच्या लाडक्या लेकीची झलक मीडियाला दाखवली होती. 

Web Title: did nitu kapoor ignores alia bhat in animal success party video viral netizens react

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.