OMG! अभय देओल पुन्हा प्रेमात? ‘लेडीलव्ह’सोबत दिल्या फ्लर्टी पोज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 01:00 PM2021-09-27T13:00:15+5:302021-09-27T13:02:09+5:30

होय, अभय देओलने शेअर केलेले फोटो पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या...

Did Abhay Deol just go public with rumoured ladylove Shilo Shiv Suleman? | OMG! अभय देओल पुन्हा प्रेमात? ‘लेडीलव्ह’सोबत दिल्या फ्लर्टी पोज

OMG! अभय देओल पुन्हा प्रेमात? ‘लेडीलव्ह’सोबत दिल्या फ्लर्टी पोज

googlenewsNext
ठळक मुद्दे2005 मध्ये ‘सोचा ना था’ या चित्रपटातून अभयने डेब्यू केला होता. या रोमॅन्टिक कॉमेडी चित्रपटात अभयच्या अपोझिट आयशा टाकिया होती.

अभिनयाची उत्तम जाण असूनही बॉलिवूडमध्ये फार कमी चित्रपटात दिसणारा एक अभिनेता म्हणजे अभय देओल (Abhay Deol). गेल्या 14-15 वर्षांच्या करिअरमध्ये  त्याने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. पण आताश: तो  फार कमी चित्रपटात दिसतो. पण तूर्तास चर्चा ही अभयच्या सिनेमाची नाही तर त्याच्या ‘लेडीलव्ह’ची आहे. होय, कदाचित अभय देओल पुन्हा एकदा प्रेमात पडलायं. तूर्तास त्याने शेअर केलेले फोटो पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
2020 मध्ये म्हणजेच गतवर्षी अभयच्या लव्हअफेअरच्या अशाच चर्चा रंगल्या होत्या. सेलिब्रिटी मॅनेजर आणि आर्टिस्ट साइरिना मामिकसोबत त्याचं नाव जोडलं गेलं होतं. आता अभयच्या लाईफमध्ये शिलो शिव सुलेमान (Shilo Shiv Suleman) हिची एन्ट्री झाल्याचं मानलं जातेय. अभयने तिच्यासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. यात अभय तिच्यासोबत फ्लर्टी पोज देताना दिसतोय.

‘फ्ल्यूड, फ्री, फ्लोइंग, सूदिंग, फन, फिअरलेस, सेन्शुअल, डायनॅमिक, टॅलेंटेड, सेक्सी... आणि या सर्व गोष्टी शिलो शिव सुलेमानमध्ये आहेत,’ असं कॅप्शन हे फोटो शेअर करताना अभयने दिलं आहे. 
अभयचं शिलो शिव सुलेमानसोबत काय नातं आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण सध्या त्याच्या व तिच्या फोटोंची जोरदार चर्चा आहे.

आधी सांगितल्याप्रमाणे अभय याआधी साइरिना मामिकसोबत रिलेशनशिपमध्ये होता. सुमारे दोन वर्ष हे दोघं एकमेकांना डेट करत होते. अगदी साइरिनाने अभयच्या घरी सेल्फ आयसोलेशनमध्ये वेळ घालवला होता. साइरिनाआधी अभय देओल प्रीति देसाईसोबत रिलेशनशिपमध्ये होता, असं म्हटलं जातं. दोघांनीही सुमारे 4 वर्ष एकमेकांना डेट केलं. प्रीतिसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अभय डिप्रेशनमध्ये गेला होता, असंही म्हटलं जातं.
2005 मध्ये ‘सोचा ना था’ या चित्रपटातून अभयने डेब्यू केला होता. या रोमॅन्टिक कॉमेडी चित्रपटात अभयच्या अपोझिट आयशा टाकिया होती. यातील अभयचा अभिनय लोकांना आवडला होता. यानंतर आहिस्ता-आहिस्ता, हनीमून ट्रॅव्हल्स प्राय.लिमिटेड, एक चालीस की लास्ट लोकल, देव डी, आयशा, जिंदगी ना मिलेगी दोबारा, शंघाई, हॅपी फिर भाग जाएगी, नानू की जानू अशा अनेक चित्रपटांत त्याने काम केलं.
 

Web Title: Did Abhay Deol just go public with rumoured ladylove Shilo Shiv Suleman?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.