डायना पेंटी कधीही नाही करणार हे काम!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2016 22:00 IST2016-08-23T16:27:28+5:302016-08-23T22:00:22+5:30
शाहरूख, दीपिका करत असतील तर करोत, पण अभिनेत्री डायना पेंटी एक काम कधीही करणार नाही. ते म्हणजे, फेअरनेस क्रिमच्या जाहिराती. ...
.jpg)
डायना पेंटी कधीही नाही करणार हे काम!!
श हरूख, दीपिका करत असतील तर करोत, पण अभिनेत्री डायना पेंटी एक काम कधीही करणार नाही. ते म्हणजे, फेअरनेस क्रिमच्या जाहिराती. डायना याच्या विरोधात आहे. सेलिब्रिटींना अधिक जबाबदार असण्याची गरज आहे. त्यामुळे मी कधीही फेअरनेस क्रिमच्या जाहिराती करणार नाही. ज्या प्रॉडक्टला तुम्ही एंडोर्स करता, त्याच्याशी रिलेट असणे गरजेचे आहे. मी जे क्रिम वापरते, त्याच क्रिमची मी जाहिरात करणार, असे डायनाने म्हटले आहे. २००९ मध्ये डायनाने एका पावडरची जाहिरात केली होती. याचे स्मरण करून दिल्यावर ते फेअरनेस प्रॉडक्ट नव्हते, असा खुलासा तिने केला. २०१२ मध्ये ‘कॉकटेल’मध्ये डायनाने साध्या भोळ्या मीराची भूमिका साकारली होती. यानंतर चार वर्षांनी ती मोठ्या पडद्यावर परतली आहे. अलीकडेच तिचा ‘हॅपी भाग जायेगी’ हा चित्रपट रिलीज झाला.