डायना पेंटी साकारणार सामाजिक संस्थेच्या कार्यकर्तीची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2017 16:37 IST2017-02-22T11:07:53+5:302017-02-22T16:37:53+5:30

अभिनेत्री डायना पेंटी ही निखील आडवाणीच्या येत्या ‘लखनौ सेंट्रल’ चित्रपटात सामाजिक संस्थेच्या कार्यकर्तीची भूमिका साकारणार आहे. तिच्यासोबत फरहान अख्तर ...

Diana Panty plays the social worker's role | डायना पेंटी साकारणार सामाजिक संस्थेच्या कार्यकर्तीची भूमिका

डायना पेंटी साकारणार सामाजिक संस्थेच्या कार्यकर्तीची भूमिका

िनेत्री डायना पेंटी ही निखील आडवाणीच्या येत्या ‘लखनौ सेंट्रल’ चित्रपटात सामाजिक संस्थेच्या कार्यकर्तीची भूमिका साकारणार आहे. तिच्यासोबत फरहान अख्तर हा असणार आहे.
याबाबत बोलताना डायना म्हणाली, ‘या चित्रपटात काम करण्याविषयी मी खूपच उत्सुक आहे. मला अशा पद्धतीच्या चित्रपटात काम करण्याची इच्छा होती. लखनौ सेंट्रल अशाच पद्धतीचा चित्रपट आहे, असे मला वाटते. निखीलने ज्यावेळी मला या चित्रपटाविषयी विचारले, त्यावेळी मी त्याला नकार देऊ शकले नाही.’
गतवर्षी डायनाने हॅपी भाग जाएगी या चित्रपटात काम केले होते. त्यानंतर ती या चित्रपटात काम करते आहे. डायनाचा गेल्या सहा वर्षातील लखनौ सेंट्रल हा तिसरा चित्रपट असणार आहे.



मला वाटते अशा प्रकारच्या भूमिका करणे माझ्यासाठी खास बाब आहे, असेही डायनाने म्हटले आहे.
डायनाने हॅपी भाग जाएगीमध्ये अभय देओल, अली फजल आणि जिमी शेरगीलसोबत काम केले होते. कॉकटेल चित्रपटातील तिच्या कामाची समीक्षकांनी स्तुती केली होती. निखील आडवाणीच्या मते ‘डायना ही खूप टॅलेंटेड आणि व्हर्साटाईल अभिनेत्री आहे. तिच्यामध्ये असणाºया अंगभूत गुणांची तिला माहिती आहे. त्यामुळे आम्हाला तिच्यासोबत काम करणे सोपे गेले.’
लखनौ सेंट्रल हा चित्रपट रणजित तिवारी हे दिग्दर्शित करीत असून, हा त्यांचा पहिलाच चित्रपट आहे. संगीताची गोडी असणाºया दोघांची जेलमध्ये भेट होते आणि सामाजिक संस्थेला मदत करण्यासाठी ते बँडची स्थापना करतात असा या चित्रपटाचा विषय आहे.

Web Title: Diana Panty plays the social worker's role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.