‘अतिथी इन लंडन’मध्ये डायना नाही!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2016 19:14 IST2016-08-02T13:44:58+5:302016-08-02T19:14:58+5:30
अभिनेत्री डायना पेंटी सध्या ‘हॅपी भाग जाएगी’मुळे चर्चेत आहे. या चित्रपटात डायना अभय देओल आणि अली फजलसोबत दिसणार आहे. ...

‘अतिथी इन लंडन’मध्ये डायना नाही!
अ िनेत्री डायना पेंटी सध्या ‘हॅपी भाग जाएगी’मुळे चर्चेत आहे. या चित्रपटात डायना अभय देओल आणि अली फजलसोबत दिसणार आहे. ‘हॅपी भाग जाएगी’नंतर डायनाने ‘अतिथी इन लंडन’ हा चित्रपट साईन केल्याची चर्चा होती. या चित्रपटात कार्तिक आर्यनच्या अपोझिट दिसणार अशीही खबर होती. मात्र डायनाने ही चर्चा निव्वळ अफवा असल्याचे म्हटले आहे. मला या चित्रपटाचा प्रस्ताव मिळाला होता. मात्र मी हा चित्रपट सध्यातरी स्वीकारलेला नाही, असे तिच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले. ‘अतिथी इन लंडन’ हा २०१० मध्ये आलेल्या अजय देवगण-कोंकणा सेन शर्माच्या ‘अतिथी तुम कब जाओगे’चा सिक्वल आहे. आता डायना यात नाही म्हटल्यावर कार्तिकच्या अपोझिट कुणाची वर्णी लागते, ते बघूयात!!