सावत्र लेक दिया मिर्झाला म्हणत नाही आई, अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली- "ती मला..."

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 09:55 AM2024-05-14T09:55:20+5:302024-05-14T09:55:58+5:30

"ती मला आई म्हणत नाही कारण...", सावत्र लेकीबाबत दिया मिर्झाचा खुलासा

dia mirza revealed that her step daugter dont call her mom recalled when son ayaan first time said mother | सावत्र लेक दिया मिर्झाला म्हणत नाही आई, अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली- "ती मला..."

सावत्र लेक दिया मिर्झाला म्हणत नाही आई, अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली- "ती मला..."

बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्री दिया मिर्झा अभिनयाबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत होती. दियाने २०१४मध्ये लग्नगाठ बांधत तिच्या वैवाहिक आयुष्याला सुरुवात केली होती. पण, तिचं पहिलं लग्न फार काळ टिकलं नाही. लग्नानंतर ५ वर्षांनी तिने घटस्फोट घेतला. त्यानंतर बिझनेसमॅन वैभव रेखीशी लग्न करत दियाने पुन्हा तिच्या आयुष्याला नव्याने सुरुवात केली. दियाचा दुसरा पती वैभवदेखील घटस्फोटित असून त्याला पहिल्या पत्नीपासून समायरा ही मुलगी आहे. 

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिया मिर्झाने सावत्र लेकीबरोबरच्या तिच्या नात्यावर भाष्य केलं. समायरा आई म्हणत नसल्याचा खुलासा दिया मिर्झाने केला. न्यूज १८ला दिलेल्या मुलाखतीत दिया म्हणाली, "समायरा मला आई म्हणत नाही. तिने मला आई, माँ किंवा मम्मा म्हणावं अशी माझी अपेक्षाही नाही. तिला आई आहे जिला ती मम्मा किंवा मॉम म्हणते. ती मला दिया म्हणूनच हाक मारते. तिच्यामुळे माझा लेक अयानही मला कधी कधी दिया म्हणतो. तो दिया मॉम म्हणतो तेव्हा मजेशीर वाटतं". 

दियाने या मुलाखतीत अयानने पहिल्यांदा आई म्हटल्याचा प्रसंगही सांगितला. "तो दिवस मी कधीच विसरू शकत नाही. तो पहिला शब्द टायगर म्हणाला होता. त्यानंतर कितीतरी दिवसांनी त्याने पहिल्यांदा मला आई म्हणून हाक मारली होती. तेव्हाचं वातावरणही खूप छान होतं. माझ्या बाल्कनीतील झाडांना फुलं येत होती. आणि त्यांच्यावर फुलपाखरं बसली होती. माझ्या हातात अयान होता. त्याला मी फुलपाखरं दाखवत होते. तेव्हा त्याने अचानक माझ्याकडे बघितलं आणि मम्मा असं म्हणाला. माझा पती तेव्हा कॅमेऱ्यात आमचं शूटिंग करत होता. त्यामुळे तो क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तो क्षण मॅजिकल होता", असंही दिया म्हणाली. 

दियाने २०२१ मध्ये वैभव रेखीशी लग्न केलं. वर्षभरातच तिने अयानला जन्म दिला. वयाच्या ३९व्या वर्षी दिया आई झाली. अनेकदा ती लेकाबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. 

Web Title: dia mirza revealed that her step daugter dont call her mom recalled when son ayaan first time said mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.