Pics : हातावर सजली मेहंदी, आज लग्न बंधनात अडकणार दीया मिर्झा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2021 02:37 PM2021-02-15T14:37:05+5:302021-02-15T14:45:08+5:30

Dia Mirza Wedding : लग्नविधी सुरु, पाहा प्री-वेडिंग सेरेमनीचे फोटो

dia mirza gives a glimpse of her stunning mehendi ahead of her wedding | Pics : हातावर सजली मेहंदी, आज लग्न बंधनात अडकणार दीया मिर्झा

Pics : हातावर सजली मेहंदी, आज लग्न बंधनात अडकणार दीया मिर्झा

googlenewsNext
ठळक मुद्देलॉकडाऊनच्या दरम्यान दीया आणि वैभव एकमेकांच्या प्रेमात पडले असे म्हटले जाते. ते अनेक महिन्यांपासून एकमेकांसोबत नात्यात असून ते इन्स्टाग्रामवर देखील एकमेकांना फॉलो करतात. 

बॉलिवूडची अभिनेत्री दीया मिर्झा आज वैभव रेखीसोबत लग्नगाठ बांधणार आहे. दीयाच्या लग्नाचा पहिला फोटो अद्याप समोर आलेला नाही. पण हो, लग्नाआधीचा दीयाच्या मेहंदीचा फोटो मात्र सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. दीयाने स्वत: हा फोटो शेअर केला आहे.
दीयाच्या हातावर वैभवच्या नावाची मेहंदी सजली आहे. इन्स्टास्टोरीवर दीयाने मेहंदी रचलेल्या हाताचा फोटो शेअर केला. ‘प्यार’, असे या फोटोवर लिहिलेले आहे.

(साभार)

सध्या दीया व वैभवच्या लग्नाचे विधी सुुरू आहेत. प्री-वेडिंग सेरेमनी व लग्नात केवळ दीया व वैभवचे कुटुंबीय शिवाय अगदी जवळचे मित्रच तेवढे सहभागी आहेत. लग्नसोहळा अतिशय खासगी असणार आहे. त्यामुळे दीयाच्या घराबाहेर सिक्युरिटी गार्डही तैनात करण्यात आले आहेत. काल दीयाच्या प्री-वेडिंग पार्टीचे फोटो समोर आले होते.

(साभार)

हे दीयाचे दुसरे लग्न आहे. याआधी तिने साहिल संघासोबत लग्न केले होते. पाच वर्षे संसार केल्यानंतर दीया व साहिल  यांनी 2019 मध्ये घटस्फोट घेतला होता.

(साभार)

दीयाच्या हृदयावर राज्य करणारा वैभव रेखी कोण आहे तर मोठा बिझनेसमॅन व इव्हेस्टर आहे. वैभव रेखी हा प्रसिद्ध व्यवसायिक मुंबईतील सगळ्यात प्रसिद्ध समजल्या जाणा-या पाली हिल परिसरात राहातो. वैभवचे देखील हे पहिले लग्न नाहीये. त्याचे पहिले लग्न योगा आणि लाईफस्टाईल कोच सुनैना रेखीसोबत झाले होते. त्यांना एक मुलगी देखील आहे.

(साभार)

लॉकडाऊनच्या दरम्यान दीया आणि वैभव एकमेकांच्या प्रेमात पडले असे म्हटले जाते. ते अनेक महिन्यांपासून एकमेकांसोबत नात्यात असून ते इन्स्टाग्रामवर देखील एकमेकांना फॉलो करतात. 
दीयाने मिस एशिया पॅसिफिकचा किताब पटकावल्यानंतर बॉलिवूडमधील दरवाजे खुले झाले. दीयाने हना है तेरे दिल में, तहजीब, कोई मेरे दिल में है, लगे रहो मुन्ना भाई आणि थप्पड या चित्रपटात काम केले आहे.

Web Title: dia mirza gives a glimpse of her stunning mehendi ahead of her wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.