ध्रुव वर्माचा 'द गुड महाराजा' १७ डिसेंबर, २०२२ला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 19:10 IST2021-04-28T19:09:56+5:302021-04-28T19:10:31+5:30
अभिनेता ध्रुव वर्माने 'नो मीन्स नो'मध्ये काम केल्यानंतर आता तो द गुड महाराजा या चित्रपटात झळकणार आहे

ध्रुव वर्माचा 'द गुड महाराजा' १७ डिसेंबर, २०२२ला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
अभिनेता ध्रुव वर्माने पहिल्या इंडोपोलिश सिनेमा नो मीन्स नोमध्ये काम केल्यानंतर आता तो द गुड महाराजा या चित्रपटात झळकणार आहे आणि तेही मुख्य भूमिकेत. हा चित्रपट जगातील दुसऱ्या महायुद्धावर आधारीत आहे. विशेष बाब म्हणजे ध्रुव वर्माने या चित्रपटासाठी कमी मानधन घेतले आहे. त्याने २० कोटींऐवजी जवळपास १२ कोटी मानधन घ्यायचे ठरविले आहे. त्याने मानधनात तडजोड का केली, यामागचे कारण वाचून तुम्ही त्याचे कौतुक कराल.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नो मीन्स नोमधील अॅक्शन सीक्वेन्समुळे ध्रुव वर्मा जगभरात भारतीय जेम्स बॉन्ड म्हणून प्रसिद्ध आहे. या चित्रपटानंतर तो द गुड महाराजा सिनेमात काम करणार आहे आणि या चित्रपटासाठी त्याने १२ कोटी मानधन घेतल्याचे समजते आहे. अभिनेत्याचा बिझनेस मॅनेजरने जवळपास २० कोटी रुपये मानधन या चित्रपटासाठी मागितले होते. मात्र नंतर ध्रुवने त्याचे मानधन कमी केले. सध्या देशातील कोरोना संकटामुळे त्याने आपल्या मानधनात तडजोड केली आहे. तो या चित्रपटासाठी १२ कोटी फीस घेणार आहे. त्याने आधीच कोव्हिड केअर सुविधा आणि वृद्धाश्रमांच्या सुधारणासाठी त्याने निधी दिला आहे.
कोविड केअर सुविधा आणि वृद्धाश्रमांच्या सुधारणासाठी आधीच दिलेली फी मोठ्या प्रमाणात देण्याचे वचन दिले आहे. या विषयावर ध्रुव म्हणाले की, “ही तीव्र वास्तवाची बाब आहे आणि पैशापेक्षा माझ्या देशातील नागरिकांचे आरोग्य अधिक महत्त्वाचे आहे” आणि आपल्या सर्व चित्रपट कमाईतून काही भाग देण्याचे वचन देतो. याबद्दल ध्रुव म्हणाला की, हे गंभीर वास्तव आहे आणि माझ्या देशातील लोकांचे आरोग्य हे पैशापेक्षा महत्वाचे आहे. तसेच त्याने त्याच्या सर्व सिनेमातील कमाईतील भाग दान करण्याचे ठरविले आहे.
द गुड महाराजा हा चित्रपट जगातील दुसऱ्या महायुद्धावर आधारीत आहे. हा चित्रपट १७ डिसेंबर, २०२२ ला रिलीज होणार आहे. इंडो पोलिश सहनिर्मिती करत असून सत्य कथेवर आधारीत हा चित्रपट आहे. याबद्दल ध्रुव म्हणाला की, मी निर्माता आणि दिग्दर्शकांचा आभारी आहे की त्यांनी पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास दाखवला. ही भूमिका माझ्या पदार्पण असलेल्या चित्रपटातील भूमिकेपेक्षा वेगळी आहे.