​धोनीचे ‘छक्के’ अन् जॉनचे ‘मुक्के’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2016 19:25 IST2016-09-24T13:55:42+5:302016-09-24T19:25:42+5:30

जॉन अब्राहम आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या मुख्य भूमिका असलेला  ‘फोर्स2’ या अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपटाच्या प्रमोशनचा धडाका सुरु झालायं. लवकरच ...

Dhoni's 'sixes' and John's 'punch'! | ​धोनीचे ‘छक्के’ अन् जॉनचे ‘मुक्के’!

​धोनीचे ‘छक्के’ अन् जॉनचे ‘मुक्के’!

न अब्राहम आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या मुख्य भूमिका असलेला  ‘फोर्स2’ या अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपटाच्या प्रमोशनचा धडाका सुरु झालायं. लवकरच चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज केला जाणार आहे. हा ट्रेलर ‘एमएस धोनी : दी अनटोल्ड स्टोरी’ या बायोपिकसोबत रिलीज केला जाणार आहे. येत्या ३० सप्टेंबरला ‘एम एस धोनी: दी अनटोल्ड स्टोरी’ चित्रपटगृहांमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटासोबत प्रेक्षकांना ‘फोर्स2’चा ट्रेलरही बघायला मिळेल. धोनी आणि जॉन रिअल लाईफमध्ये चांगले मित्र आहेत. त्यामुळे ‘फोर्स2’चा ट्रेलर धोनीच्या बायोपिकसोबत दाखवणे साहजिक आहे. अभिनय देव दिग्दर्शित ‘फोर्स2’हा आगामी सिनेमा सन २०११ मध्ये आलेल्या ‘फोर्स’चा सीक्वल आहे. जॉनचा याआधीचा चित्रपट ‘ढिशूम’मध्ये क्रिकेट कनेक्शन दाखवण्यात आले होते. यात जॉनने भारतीय गुप्तचर अधिकाºयांची भूमिका साकारली होती.

Web Title: Dhoni's 'sixes' and John's 'punch'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.