धवल कुलकर्णी व रोबिन उथप्पा अडकले विवाहबंधनात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2016 08:52 IST2016-03-03T15:30:11+5:302016-03-03T08:52:50+5:30
भारताचा वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णी आणि गोलंदाज रोबिन उथप्पा हे दोघेही आज गुरुवारी बॅचलर लिस्टमधून आऊट झालेत. म्हणजे काय? ...

धवल कुलकर्णी व रोबिन उथप्पा अडकले विवाहबंधनात
भारताचा वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णी आणि गोलंदाज रोबिन उथप्पा हे दोघेही आज गुरुवारी बॅचलर लिस्टमधून आऊट झालेत. म्हणजे काय? तर हे दोघेही गुरुवारी विवाह बंधनात अडकले. धवलने सहचारिणी म्हणून श्रद्धा खारपूडे या फॅशन कॉर्डिनेटरशी लग्नगाठ बांधली. चार वर्षांपूर्वी धवल व श्रद्धा एकमेकांना प्रथम भेटले होते. या लग्नात दोघांनीही महाराष्ट्रीयन पारंपरिक पोशाख परिधान केले होते. रोबिन उथप्पानेही टेनिस खेळाडू शीतल गौतम हिच्याशी साता जन्माची गाठ बांधली. इरफान पठाण व बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला या विवाहाला हजर होते.