​धमेंद्र नानावटी सुपर स्पेशलिटी रुग्णालयात दाखल; प्रकृती स्थिर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2016 19:25 IST2016-12-20T19:25:53+5:302016-12-20T19:25:53+5:30

बॉलिवूडचे ही मॅन धमेंद्र यांना मुंबईतील नानावटी सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. धमेंद्र यांना पोटाचा विकार झाल्याने ...

Dharmendra Nanavati admitted to Super Specialty Hospital; The condition is stable | ​धमेंद्र नानावटी सुपर स्पेशलिटी रुग्णालयात दाखल; प्रकृती स्थिर

​धमेंद्र नानावटी सुपर स्पेशलिटी रुग्णालयात दाखल; प्रकृती स्थिर

ong>बॉलिवूडचे ही मॅन धमेंद्र यांना मुंबईतील नानावटी सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. धमेंद्र यांना पोटाचा विकार झाल्याने काल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना दोन दिवसांत सुटी दिली जाईल असे नानावटी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितले आहे. 

८१ वर्षीय धमेंद्र यांची सोमवारी अचानक पोटात दुखायला सुरुवात झाली. त्यांना आतड्यांवर सूज आल्याने उलटया व पोटात मुरड, ताप आला. तत्त्काळ त्यांना नानावटी सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना अँटिबायोटिक औषधे दिली असून आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येते. 

Darmendra Mumbai hospital

नानावटी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृ तीची माहिती दिली. धमेंद्र यांना पोटाचा त्रास व आतड्यांवर सूज आली होती. आम्ही त्यांना अ‍ँटिबायोटिक औषधे दिली असून त्यांचा लवकरच परिणाम दिसून आला. त्यांना फार काळ रुग्णालयात भरती राहण्याची आवशक्त भासणार नसून त्यांना लवकरच सुटी देण्यात येईल असे डॉ. विशेष अग्रवाल यांनी सांगितले. आम्ही त्यांना ४८ तासांच्या विशेष निरीक्षण कक्षात दाखल केले आहे. त्यांच्या प्रकृतीवर नजर ठेवली जात असून आता त्यांचे शरीर औषधांंवर सकारात्मक प्रतिक्रिया देत आहे. 

मागील वर्षी मे महिन्यात सेटवर शूटिंग दरम्यान धमेंद्र यांना दुखापत झाली होती. त्यावेळी त्यांना ब्रिच क्रँ डी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. येथे त्यांच्या खांद्याची शस्त्रक्रिया करून उपचार करण्यात आले होते. 

नुकतेच काही दिवसांपूर्वी धमेंद्र यांनी आपला ८१ वा वाढदिवस चाहत्यांसोबत साजरा केला होता. 

Web Title: Dharmendra Nanavati admitted to Super Specialty Hospital; The condition is stable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.