​धनुष म्हणतो, मी डीएनए टेस्ट करणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2017 13:40 IST2017-04-12T08:10:38+5:302017-04-12T13:40:38+5:30

‘षमिताभ’ आणि ‘रांझना’ यासारखे हिट सिनेमे देणारा साऊथ स्टार धनुष याच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. मेगास्टार रजनीकांतचा जावई असला ...

Dhanush says, I will not do DNA test | ​धनुष म्हणतो, मी डीएनए टेस्ट करणार नाही

​धनुष म्हणतो, मी डीएनए टेस्ट करणार नाही

मिताभ’ आणि ‘रांझना’ यासारखे हिट सिनेमे देणारा साऊथ स्टार धनुष याच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. मेगास्टार रजनीकांतचा जावई असला तरी धनुष एका कायदेशीर अडचणीत सापडला आहे. आता या प्रकरणाला एक नवी कलाटणी मिळाली आहे. होय, धनुष हा आपला हरवलेला मुलगा आहे, असा दावा एका वृद्ध दांम्पत्याने केला आहे. धनुषची डीएनए चाचणी करावी, अशी मागणी या दांम्पत्याने मद्रास हायकोर्टात केली होती. पण धनुषने डीएनए टेस्ट करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. कुणी काहीही दावे केल्याने मी डीएनए टेस्ट करणार नाही. हे माझ्या खासगी आयुष्याशी निगडीत प्रकरण आहे. माझी प्रायव्हसीचे प्रकरण आहे, असे धनुषने म्हटले आहे.

ALSO READ : धनुषच्या खांद्यावरील तीळ गेला कुठे?

कातिरेसन आणि त्यांची पत्नी मीनाक्षी या तामिळ दांम्पत्याने धनुष हा त्यांचा मुलगा असल्याचे म्हटले आहे.  धनुषच्या उजव्या कॉलरबोनजवळ एक तीळ आहे आणि त्याच्या डाव्या बाजूने एक निशाणी आहे. त्यामुळे धनुषच त्यांचा मुलगा कलईचेवलन असून, जो २००२ मध्ये अभिनेता होण्यासाठी चेन्नईला पळून गेला होता, असा दावा या दांम्पत्याने केला आहे. दरम्यान धनुषने तामिळ दांम्पत्याचे सगळे दावे फेटाळून लावले आहेत या दांपत्याने केलेला दावा हा पूर्णत: खोटा आहे. यांच्या हरवलेल्या मुलाशी माझा काहीही संबंध नाही. मला ब्लॅकमेल करण्याचा हा प्रयत्न केला जात आहे, असे त्याने म्हटले आहे. धनुषकडून जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार, धनुषचे खरे नाव व्यंकटेश प्रभू आहे. तो तामिळ फिल्म प्रोड्यूसर कस्तुरी राजा यांचा मुलगा असून, दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतची मुलगी ऐवर्श्या हिचा पती आहे. धनुष बॉलिवूडमध्ये त्याच्या ‘कोलावेरी डी’ या गाण्यातून चर्चेत आला होता. त्यानंतर त्याने सोनम कपूरबरोबर ‘रांझणा’ या सिनेमात काम केले. या सिनेमानंतर तो महानायक अमिताभ बच्चन आणि अक्षरा हसन यांच्याबरोबर ‘षमिताभ’मध्येही बघावयास मिळाला होता. 

Web Title: Dhanush says, I will not do DNA test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.