​‘धाकड गर्ल’ सान्या मल्होत्राचा हा डान्स व्हिडिओ पाहाच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2017 12:12 IST2017-03-21T05:54:01+5:302017-03-21T12:12:31+5:30

‘दंगल गर्ल’ सान्या मल्होत्रा (होय, तीच ती आमिरची ‘धाकड’ गर्ल बबीता फोगाटची भूमिका साकारणारी अभिनेत्री) सध्या जोरात आहे. होय, तिचा सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला लगेच त्याची कल्पना येईल.

'Dhakde Girl', watch this dance video of Sanya Malhotra! | ​‘धाकड गर्ल’ सान्या मल्होत्राचा हा डान्स व्हिडिओ पाहाच!

​‘धाकड गर्ल’ सान्या मल्होत्राचा हा डान्स व्हिडिओ पाहाच!

ंगल गर्ल’ सान्या मल्होत्रा (होय, तीच ती आमिरची ‘धाकड’ गर्ल बबीता फोगाटची भूमिका साकारणारी अभिनेत्री) सध्या जोरात आहे. होय, तिचा सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला लगेच त्याची कल्पना येईल. ‘दंगल’नंतर सान्या सोशल मीडियात बरीच लोकप्रीय झालीय. सतत नवे काहीतरी शेअर करून ती तिच्या चाहत्यांना रोज नवी ट्रिट देत असते. नुकताच तिने तिच्या धमाकेदार डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. तिच्या या धमाकेदार डान्स व्हिडिओने सध्या धुमाकूळ घातला आहे. इतका की,१८ तासांमध्ये ८० हजारपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. यात सान्या एका पंजाबी गाण्यावर डान्स करताना दिसतेयं.  हा डान्स व्हिडिओ पोस्ट करताना सान्याने नेहा भसीनला टॅग केले आहे.मला हे गाणं खुप आवडतं. नेहा भसीन तुम्ही खूप कमाल आहात, असे तिने म्हटले आहे. आता सान्याचा हा व्हिडिओ तुम्हीही बघा आणि आवडलाच तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा...!
 


तुम्हाना ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल, पण सध्या सान्या आमिर खानच्या आगामी ‘सीक्रेट सुपरस्टार’ या सिनेमातील एक गाणे कोरिओग्राफ करत आहे. जेव्हा डिरेक्टर अद्वैत चंदनने मला आमिरच्या ‘सीक्रेट सुपरस्टार’ मधील एक गाणं कोरिओग्राफ करण्यासाठी विचारले, तेव्हा मी हैराण झाले. मी स्वप्नातही याचा कधी विचार केला नव्हता, अशी तिची यावरची प्रतिक्रिया होती.

ALSO READ : जेव्हा ‘बेटी’च्या तालावर आमीर खान ठुमके लावतो तेव्हा...!

ताज्या मीडिया रिपोर्टनुसार सान्या अनुराग कश्यपच्या आगामी ‘मनमर्जियां’ सिनेमात बघायला मिळू शकते. आनंद एल राय निर्मित या सिनेमात आयुष्मान खुराना आणि भूमि पेडणेकर मुख्य भूमिकेत बघायला मिळणार आहेत.

Web Title: 'Dhakde Girl', watch this dance video of Sanya Malhotra!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.